या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक, पण सरदारची पावभाजी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
ज्यांना पावभाजी आवडते, त्यांनी एकदा तरी मुंबईत आल्यावर ही पावभाजी खाऊन पहायलाच हवी, निश्चितच सरदारची पावभाजी तुमच्या आठवणीतील पावभाजीपैकी एक ठरेल.
पावभाजीबरोबर येणारा पाव हा खूप चांगला आणि बटर लावलेला असतो, तो चांगल्या प्रतिचा असावा असं वाटतं, कारण सारखा त्याला तोडत बसावं लागत नाही. एकदा सरदारची पावभाजीची चव घेतली, की पुन्हा ‘सरदार’ची भेट ठरलेलीच असते.
पत्ता : तुम्ही मुंबईत राहत नसले, तरी तुम्हाला मुंबईत हाजीअली कुठे आहे?, हे माहित असेल, महालक्ष्मी स्टेशन, पेडररोड, मुंबई सेन्ट्रल यापासून सरदार एक दीड किलोमीटरवर आहे. टॅक्सीवालाही तुम्हाला सरदारपर्यंत सहज नेऊन सोडणार. त्याला फक्त सांगा ताडदेवला जायचंय, सरदारची पावभाजी खायला.
166 बी एम.मालविया मार्ग, ताडदेव-तुलसीवाडी, वसंतराव नाईक चौकाजवळ, मुंबई, महाराष्ट्र – 400 034