भारतमाता सिनेमाजवळ गेल्यावर तुम्हाला लाडूसम्राटचं सहज दर्शन होवू शकतं.
लालबागच्या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही कधी गेले, तर लाडूसम्राटला जरूर भेट द्या. लाडूसम्राटवर सतत वर्दळ असते, म्हणून जरा दमानंही घ्यावं लागेल.
लाडूसम्राटमध्ये जैन वडाही मिळतो, हा वडा फक्त रविवारी मिळतो.
लाडूसम्राटमध्ये अनेक प्रकारच्या मिठाया आहेत. आंब्याचा सिझन असला की इथली आमरस पुरीची चव चाखण्यासाठी गर्दी होते.
उपवासाचा दिवस असो किंवा नसो, लाडूसम्राटमध्ये साबुदाणा खिचडीही मिळते.
लाडू सम्राटची बासुंदीही अनेकांना आवडते. लाडू सम्राटचं पियुषही प्रसिद्ध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाडूसम्राटच्या मिसळ पावनेही खवय्यांची मनं जिंकली आहेत.