मुंबई | कुलाब्याचं ऑलिम्पिया कॉफी हाऊस आपल्या अनोख्या टेस्टसाठी प्रसिद्ध आहे. हे मांसाहारी हॉटेल म्हणावं लागेल, खास करून मोगलाई पदार्थ इथली खासियत.
ऑलिम्पियाचा प्रत्येक पदार्थ जीभेवर आपली चव ठेऊन जातो, आणि पुन्हा कधी इथे भेट देणार असं सतत मनात वाटत असतं.
हा हॉटेलात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला काऊंटरवर एक गृहस्थ बसलेले दिसतील. आत सर्व मुस्लीम वेटर दिसून येतील, मात्र या हॉटेलात बीफ सर्व्ह केलं जात नाही, हे हॉटेल फार जूनं आहे.
हे हॉटेल जेवढं जूनं आहे, तेवढीच चवही जुनी, कधीही न बदलणारी. हे हॉटेल १९१८ पासून सुरू करण्यात आलं आहे.
तुम्ही या हॉटेलात चहा जरी घेतला, तरीही तुम्हाला कळेल, या चहा आणि कॉफीची वेगळी चव. अंड्याचं ऑम्लेट आणि पाव ऑर्डर करा आणि पाहा. पाहूनच कळेल, भलं मोठं ऑम्लेट डीश भऱून, मोठे मऊ पाव. हीच खरी मज्जा ऑम्लेट आणि पाव खाण्याची…बस्स.
तुम्हाला चिकन मसाला आणि चपातीही मागवता येईल, इथलं चिकन आणि त्याबरोबरची करीची चवही छान असते. मटणही मिळत, त्यात चव फारशी बदलत नाही, मसाल्याची करी बहुदा सारखीच असावी, चपाती घरी असते तशी भली मोठी.
‘हाफराईस’सोबत खायला होईल, एवढी करी डिशमध्ये शिल्लक राहते. करी नाही पुरली, तर ‘रस्सा मार कें दू क्यां’, असं वेटर विचारल्याशिवाय राहत नाही.
मोगलाईशी संबंधित अनेक चिकन-मटणचे पदार्थ मिळतात, पार्सलची सोय आहे. पार्सल घरपोच मिळत नाही. एसीसाठी वरच्या मजल्यावर जावं लागतं.
एसी नसलेल्या मजल्यावर पांढऱ्या चिनीच्या डिशमध्ये पदार्थ सर्व्ह केले जातात. एसीमध्ये स्टेलनेस स्टीलच्या प्लेटस् असतात, जेवण झाल्यावर इथली कुल्फीही अप्रतिम आहे बरं का?, ती टेस्ट करायला हरकत नाही.
पदार्थ
चहा
चिकन मसाला
मटण मसाला
मटण फ्राय मसाला
चिकन फ्राय मसाला
बिर्याणी
खिमा पाव
ऑम्लेट पाव
भेजा मसाला
मटण रोस्ट
भाजी घोश्त
बटर स्कॉट फालुदा
कुल्फी
फोन नंबर (+91) 22 22021043, (+91) 22 22045220, (+91) 9820151538
पत्ता – ग्राऊंड फ्लोअर, रहिम मेन्शन १, लिओपोल्ड कॅफेसमोर, शहीद भगतसिंग मार्ग, कोलाबा, मुंबई 400039