South Mumbai | Bademiya, Colaba

South Mumbai : Bademiya is located near Gate way of India. It is definitely one of the best street food places which beats many great restaurants in taste and definitely in price.

he kabab are the one of the most attractive menu item over here. people from multiple place visit this food corner only because its popularity.

the corner has a seperate arrangement made for sitting….

 

 

 

‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

सीएसटी स्थानकासमोरचं आराम हॉटेल
सीएसटी स्थानकासमोरचं आराम हॉटेल

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे.

या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे.

या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना दिसून येतात.

आराम हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व मराठी पदार्थांची चव घेता येते. यात बासुंदी पुरीपासून उपवासाचा फराळही उपलब्ध आहे.

मिसळ पाव, पियुष, मसाला दुध, कोल्हापुरी मिसळ, दही खिचडीही येथे मिळते, उन्हाळ्यात कैऱ्हीचे पन्हे मिळते.

उन्हाळ्यात अनेक वेळा हे पन्हे कधीच संपलेले असते. उन्हाळ्यात पन्ह्याची मागणी वाढते.

राजगीरा पुरीला ही अनेक जण उपवासासाठी प्राधान्य देतात. इथला चहाही अप्रतिम असतो.

सीएसटीच्या एवढ्याजवळ असल्याने या दुकानात नेहमीच गर्दी असते, 1941 पासून हे हॉटेल आजही सुरू आहे. आपली चव कायम राखून आहे.

सीएसटी स्थानकातून पश्चिमेकडे जाणाऱ्या बोगद्यातून वर आल्यावर तुम्हाला आराम हॉटेल दिसेल.

‘सरदार’ची पावभाजी

vegतुम्हाला सरदारची पावभाजी माहित आहे का? या पावभाजीची ख्याती अख्ख्या दक्षिण मुंबईत आहे. पावभाजीसाठी ‘सरदार हॉटेल’समोर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी रांग लागते.

या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक, पण सरदारची पावभाजी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झाली आहे.Sardar Pav Bhaji या पावभाजीत तुम्हाला जास्तच जास्त, टॉमॅटो आणि भरपूर बटर एवढंच काय ते ओळखता येईल.

ज्यांना पावभाजी आवडते, त्यांनी एकदा तरी मुंबईत आल्यावर ही पावभाजी खाऊन पहायलाच हवी, निश्चितच सरदारची पावभाजी तुमच्या आठवणीतील पावभाजीपैकी एक ठरेल.

Sardar PavBhajiभरपूर बटर आणि प्लेटभरून पावभाजी आणि क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे सरदारची पावभाजी. ही पावभाजी दोन जणांमध्ये शेअर करूनही काहीजण खातात. यासोबत वेगळ्या प्लेटमध्ये कांदा आणि लिंबू.

पावभाजीबरोबर येणारा पाव हा खूप चांगला आणि बटर लावलेला असतो, तो चांगल्या प्रतिचा असावा असं वाटतं, कारण सारखा त्याला तोडत बसावं लागत नाही. एकदा सरदारची पावभाजीची चव घेतली, की पुन्हा ‘सरदार’ची भेट ठरलेलीच असते.

पत्ता : तुम्ही मुंबईत राहत नसले, तरी तुम्हाला मुंबईत हाजीअली कुठे आहे?, हे माहित असेल, महालक्ष्मी स्टेशन, पेडररोड, मुंबई सेन्ट्रल यापासून सरदार एक दीड किलोमीटरवर आहे. टॅक्सीवालाही तुम्हाला सरदारपर्यंत सहज नेऊन सोडणार. त्याला फक्त सांगा ताडदेवला जायचंय, सरदारची पावभाजी खायला.

166 बी एम.मालविया मार्ग, ताडदेव-तुलसीवाडी, वसंतराव नाईक चौकाजवळ, मुंबई, महाराष्ट्र – 400 034

खवय्या गिरगावकर!

(अश्विन बापट) आमच्या ‘एबीपी माझा’वरील’चॅट कॉर्नर’ या एन्टरटेन्मेंट शोसाठी अभिनेता संजय मोने यांना निमंत्रित केलं होतं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तू राहायला कुठे आहेस ? मी म्हटलं, गिरगावात. असं म्हणताक्षणी संजय मोने यांनी गिरगावातले त्यांचे दिवस सांगायला सुरुवात केली.

खास करून गिरगावातली खाद्य चळवळ यावर ते भरभरून बोलले. त्यावेळी मीही त्यांच्या त्या खमंग चर्चेच्या वेळी मनाने का होईना अवघं गिरगाव फिरून आलो.

girgaonप्रत्येक ठिकाणची वेगळी अशी खाद्यसंस्कृती असते, तशीच ती गिरगावचीही आहे.अगदी आमच्या लहानपणी प्रार्थना समाजच्या नाक्यावर असायची ती कुलकर्ण्यांकडची खमंग बटाटा भजी,  प्लेट आल्या आल्या भज्जी खल्लास.

जसं हल्ली दादरच्या श्रीकृष्ण वडेवाल्याचं होतं. तिकडून पुढे आल्यावर ठाकुरद्वारला जाणारा रोड म्हणजे खाद्यप्रेमींसाठी पर्वणी. उजव्या बाजूला राजा हॉटेल, दाक्षिणात्य आणि पंजाबी पदार्थांची रेलचेल. राजाचं सांबार आणि चटणी यांची चव आजही तिच जिभेवर रेंगाळणारी. त्याच्या बाजूला पूर्वी पुरोहितचं दुकान होतं.

ज्या ठिकाणच्या खर्वसाची गोडी आजही कित्येकांच्या ओठात तरळतेय. आज तिकडे पणशीकर आहार आहे. ज्या ठिकाणचं फराळी पॅटिस खास डिमांडमध्ये.

तुम्ही उपवासाच्या कोणत्याही दिवशी या ठिकाणी जा, तुम्हाला फुटपाथ भरलेला दिसेल, पणशीकर समोरचा. अन्य खाद्यपदार्थही रुचकर. पण, पॅटिसकी बात कुछ और ही है… गरम गरम पॅटिसमध्ये पणशीकरांनी  मनुका वगैरे अगदी मनापासून घातलेल्या. सोबत त्यांची अशी खास चटणी. पणशीकरचा नुसता बोर्ड बाहेरून पाहिला तरी ते प्लेटमधलं पॅटिसच त्या बोर्डमध्ये दिसायला
लागतं, इतकं ते पॅटिस मनात घर करून आहे.

याच्या अगदी समोर पूर्वी वीरकर आहार भवन होतं, ज्याच्याबद्दल संजय मोने आवर्जून बोलले, जे आमच्या पिढीने फक्त ऐकलंय.

तिथून पुढे गेलो की, निकदवरी लेनच्या नाक्यावर कोना हॉटेल होतं. मराठमोळं जेवण मस्त आणि माफक दरात मिळायचं. अगदी हल्ली हल्लीपर्यंत. आता तिकडे एक बँक झालीय. (आमचा खाण्याचा एक ऑप्शन कमी झाला.)

तोच कोनाचा फुटपाथ पकडून सरळ पुढे जायचं, तिथे कोल्हापुरी चिवडा आणि गोविंदाश्रम ही दोन हॉटेल्स अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. वेलणकरांचं कोल्हापुरी चिवडा, ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांबरोबरच दिवाळी फराळाचे पदार्थही मिळतात. पुढे  असलेल्या गोविंदाश्रममध्येदेखील खाद्यप्रेमींच्या उड्या पडायच्या.

त्याच लाईनमध्ये सरळ पुढे ठाकुरद्वार सिग्नलला जायचं. त्या ठिकाणी पूर्वीचं बी. तांबे उपहारगृह आणि आताचं सुजाता हॉटेल. यांच्याकडची मिनी थाळी एकदम स्पेशल. खास करून त्यांच्या आमटीची चव काहीतरी वेगळीच बुवा.

एक जानेवारीला खा किंवा ३१ डिसेंबरला तीच चव. क्या बात है…मिनी थाळी खाताना एक एक्स्ट्रा आमटी फक्त पिण्यासाठी घेणारी माझ्यासारखी अनेक मंडळी मी पाहिली आहेत. यांची डाळिंबी उसळ आणि झुणकाही एकदम फर्मास. मी या हॉटेलमध्ये खाल्लेला आणखी एक पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा. केवळ अफलातून.

तिथून डावीकडे वळलं की फणसवाडीला जाणारा रस्ता लागतो. त्या ठिकाणी जुन्या मंडळींचं लाडकं, माफक दरात फक्त भोजन देणारं क्षुधा शांती भुवन. अतिशय साधं असं हे हॉटेल, आजही आपली ग्राहकसंख्या टिकवून आहे.

भाजी-पोळी, आमटी-भात, लोणचं किंवा चटणी सोबत पापड. ताक, दही. अन्न हे पूर्णब्रह्मची उक्ती सार्थ ठरवणारं खऱ्य़ा अर्थाने क्षुधा शांत करणारं हे क्षुधा शांती.

त्याच फुटपाथने सरळ पुढे गेलात की, फणसवाडी नाक्यावर मोठ्या मानाने उभं आहे ते टेंबेंचं विनय हेल्थ होम. मिसळ, बटाटेवडा हे यांचे पेटंट पदार्थ.

यांचं हॉटेल सलमानच्या पिक्चरनी जसं थिएटर हाऊसफुल्ल असतं तसं नेहमी खाऊसफुल्ल. काऊंटरवर टेंबे काका किंवा त्यांचा भाचा शैलेश देशपांडे अतिशय हसतमुखाने तुमच्याशी खास गप्पा मारणार. म्हणजे गप्पांचीही भूक मनसोक्त भागवली जाते.

इकडून सरळ गल्लीतून व्ही.पी.रोडवर बाहेर पडलात की, फडके गणपती मंदिरच्या समोर लागतं ते प्रकाश दुग्ध मंदिर. पेढे आणि अन्य पदार्थांबरोबरच यांचं पियुष केवळ लाजवाब.

हॉटेलमध्ये काहीही न खाता बाहेर उभं राहून ग्लासमागून ग्लास रिचवणारे पियुषप्रेमी त्या ग्लासमधल्या
पियुषसारखे रस्त्यावर ओसंडून वाहत असतात. यांचा साबुदाणा वडाही एकदम टेस्टी बरं का ?

गिरगाव आणि त्याच्या आसपास अशी खाण्याचे लाड करणारे असंख्य स्पॉट आहेत.पावभाजीवर तुटून पडणाऱ्यांसाठी गिरगाव चर्चसमोरचं मनोहर पावभाजी हा हॉ़ट स्पॉट. यांच्याकडे कोजागिरीसारख्या दिवशी तर ५०-५० प्लेट भाजी, २०० पाव अशा असंख्य ऑर्डर्स असतात.

शिवाय पुलाव, खडा भाजी, मसाला पावही एकदम डिमांडमध्ये. केवळ मस्का नव्हे तर यांच्याकडे साधी भाजीदेखील मिळते, म्हणूनही हे हॉटेल एकदम खास.

मनोहरच्या समोरचं जामनगरी फरसाण मार्ट, जिकडे फरसाण, जिलबी-पापडी, फराळी छोटे पॅटिस हा फेमस मेन्यू. त्याच्या बाजूलाच गेल्या काही वर्षांपासून फ्री इंडिया बेकरी झालीय. जिकडे फक्त व्हेज पदार्थ मिळतात.

केक्सपासून यांचं व्हेज पॅटिस एकदम खाण्यासारखं. पुढे चर्चच्या फुटपाथला आल्यावर समोरच फेमस भेळवाला आणि बाजूला कुल्फीवाला. मिक्स कुल्फीची लज्जत न्यारी. रात्री १० नंतर खास करून शनिवारी किंवा गणपतीच्या दिवसांमध्ये ही मंडळी फुल टू मागणीत.

त्याच्या डायगोनली अपोझिट व्हॉईस ऑफ इंडिया हा इराणी. याच्या वाफाळलेल्या चहाची चव तांबेच्या आमटीप्रमाणेच वर्षानुवर्ष तीच. बनमस्का सोबत हा चहा, त्याला साथ मित्रमंडळींची. मग काय विचारता, या इराण्याच्या हॉटेलमध्ये अनेक मोठ्या कलाकारांपासून पत्रकारांपर्यंत साऱ्यांच्या गप्पांच्या मैफली रंगल्याचं ऐकलंय. आम्हीही मारतो अधूनमधून चक्कर.

अशी अगणित ठिकाणं सांगता येतील, आजूबाजूच्या परिसरातली. स्टेशन रोडकडे जाताना दोन ज्युसवाले. ज्यांच्याकडे नेहमी तोबा गर्दी ठरलेली. त्याच्या आधी पूर्वी दरयुश बेकरी होती, जिकडचे बेकरी आयटम सॉल्लिड फेमस होते.

पुढे गेल्यावर ताराबागची भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस. हिंदुजाच्या कॉर्नरवरचा सँडविचचा स्टॉलही तितकाच त्याच्या सँडविच टेबलइतकाच माणसांनी भरलेला. तसं प्रार्थना समाजच्या बाजूला गेलात तर, राहण्याची सोय असलेल्या माधवाश्रममधलं उकडीच्या मोदकांचं जेवणही अगदी लक्षात राहणारं. त्याच्या अगदी जवळ असलेली मुमताजची टेस्टी पावभाजीची गाडी. अगदी रात्री उशीरापर्यंत ही गाडी गजबजलेली असते.

असे असंख्य खाण्याचे अड्डे अजूनही सांगू शकतो. त्यात काळानुरुप काही आयटम नव्याने अँड झालेत. ज्यामध्ये शिववडापावच्या गाड्या आहेत तसेच कोळशाच्या शेगडीवरचा खिचिया पापड, मसाला पापडही आहेच. एक पापड खाल्ला तरी पोट एकदम फुल होऊन जातं.

तर, चायनीज भेळेची टेबलंही दिसू लागलीयेत काही ठिकाणी. याशिवाय सकाळच्या वेळी लागणाऱ्या पोहे,उपमा,इडली-वडा, साबुदाणा वडा यांची असंख्य बाकडी, टेबलं याची काही गिनतीच नाही.

किती खाऊ आणि किती नको, असं होऊन जातं. तसं या खाद्यभ्रमंतीवर किती लिहू आणि किती नको, असं झालंय माझं. व्हेज खाण्याबद्दल मी भरभरुन लिहिलं. मात्र मांसाहार करणाऱ्यांसाठीही अनंताश्रम होतंच.

फक्त बिंग अ व्हेजिटेरियन तिकडे कधी जाणं झालं नाही. असो, खाता खाता तोंडाला पाणी सुटतं, मला लिहिता लिहिता सुटलंय, त्यामुळे जाऊन एखाद्या हॉटेलमधल्या डिशवर ताव मारतोच. तुम्हीही गिरगावमधल्या या खादाडीची चव चाखा एकदा तरी.

(अश्विन बापट हे एबीपी माझाचे एँकर आहेत)