‘आनंद भवन’ची मिसळ

vegलालबागच्या माणसाला भूक लागली आणि त्याला आनंद भवनच्या मिसळीची तलफ लागली नाही, तर समजायचं हा माणूस लालबागमध्ये नवीनच रहायला आला आहे. तलफ अशा अर्थाने की, आनंद भवनची मिसळ तर चवदार आहेच, मात्र आनंद भवनचा चहाही तलफ लावणारा आहे.

साठ वर्षांपासून जपलेली चवanand_bhavan_misal

आनंद भवनने 60 वर्षापासून आपल्या मिसळची चव जपली आहे. आनंद भवनची मिसळ आणि चव जरा हटके आहे. तिखट कमी खाणाऱयांना ही मिसळ जरा तिखट वाटू शकते. पण झणझणीतपणा आल्याशिवाय तिला मिसळ तरी कोण म्हणणार?

आनंद भवनच्या मिसळीची चवीचं रहस्य मिसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्स्यात दडलं आहे.

हे तुम्हाला मिसळ पाहूनच कळेल, कारण साध्या नजरेला मिसळीत वाटाणे आणि पापडी शेव शिवाय काहीच ओळखता येत नाही.  आनंद मिसळने साठ वर्षापासून आपलं वैशिष्ट कायम ठेवलं आहे.

वडापावही प्रसिद्ध

आनंद भवनचा वडापावही तेवढाच चांगला आहे. वेळ नसणारे वडापाव खाऊन रस्ता धरतात. काही गुजराथी कुटूंब आनंद भवनच्या मिसळीचं पार्सल घरी नेतांना नेहमी दिसतात. आनंद भवनमध्ये नेहमीच स्वच्छतेला महत्व देण्यात आलं आहे. साधारण तीन-चार वर्षांपूर्वी आनंद भवनने आपलं रूपडं बदललंय. पण चव मात्र 60 वर्षांपूर्वी होती ती आजही कायम आहे.

पत्ता : आनंद भवन हे हॉटेल चिंचपोकळी स्टेशनच्या पूर्व बाजूला आहे. स्टेशनपासून पाच मिनिटं अंतरावर सरदार हॉटेलच्या पुढे हे हॉटेल आहे. लालबागपासून व्होल्टाजकडे जातांना हे सरदार हॉटेलच्या चौकात आनंद भवन हे हॉटेल कुणालाही विचारा…. तुम्ही मिसळीपर्यंत पोहोचलात असं समजायचं.

Leave a Reply