हळदी गाजराचे भरीत (रायता)

सौ. अनघा निलेंद्र खेर  साहित्य – तीन ते चार कोवळी हळदी गाजरे, तीन ते चार सांडगे मिरच्या, मध्यम आकाराचे एक वाटी थोडेसे आंबट दही, चवीनुसार मीठ, हवी असल्यास चिमुटभर साखर , दोन टेबल स्पून तेलाची फोडणी, मोहरी, हळद, हिंग कृती – प्रथम गाजरे धुऊन, चांगली शिजवून घ्यावीत. चार शिट्य़ांपर्यंत शिट्या कराव्यात. थंड झाल्यावर, त्याची साले काढून चार भाग करून अगदी बारीक चिरावी. पळीने थोडीशी चेचावी, … Continue reading हळदी गाजराचे भरीत (रायता)

पूर्णाहार कोशिंबीर

साहित्य : 1 जुडी कांद्यांची हिरवी पात, भिजवलेली उडदाची आणि मुगाची डाळ प्रत्येकी 2 चमचे, हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, दाण्याचे कूट, मीठ-साखर, घट्ट दही किंवा अर्ध्या लिंबाचा रस, तेल फोडणीसाठी मोहरी-हिंग आणि हळद, पाव वाटी किसलेले गाजर. कृती : कांद्याची पात धुवून, बारीक चिरून त्यात दही आणि लिंबू रस न घालता, बाकीचे साहित्य सुरूवातीला घालावे आणि नीट एकत्रित करावे, त्यावर दही … Continue reading पूर्णाहार कोशिंबीर

सुधारस

साहित्य : ६ मोठी कागदी लिंबे (रसदार), साखर, सजावटीसाठी बदाम, पिस्ते, वेलची पूड, केशर. कृती : प्रथम एका भांड्यात (पाण्याचा हात न लागता) लिंबाचा रस काढून घ्यावा. तो रस एका वाटीत गाळून घ्यावा. एक वाटी रसाकरता ६ वाट्या साखर घेऊन साखरेचा पक्का पाक करावा. पक्का पाक झाला की, त्यात रस ओतावा. एक उकळी आली की, चटकन गॅसवरुन पातेले खाली उतरवावे. त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे काप, … Continue reading सुधारस

पिकलेल्या हापूस आंब्याचे रायते

साहित्य : तीन आंबे, तिखट – १ चमचा, भाजून मेथीकूट -१ चमचा, धणे पूड कच्ची – १ चमचा, मिरीपूड लहान – एक चमचा, गूळ लहान वाटी (चिरलेला), मीठ चवीपुरते, नारळाचे दूध फोडणीचे साहित्य : मोहरी, मेथी, दाणे, तेल कृती : प्रथम बाठीसकट आंबे कोळून घ्यावे, त्याला धणे पूड, मेथीपूड, तिखट हे सर्व बाठीसकट कोळाला लावावे. एका भांड्यात नारळाचे दूध काढून घ्यावे. त्यात लहान चमचा मिरीपूड … Continue reading पिकलेल्या हापूस आंब्याचे रायते