साहित्य : ६ मोठी कागदी लिंबे (रसदार), साखर, सजावटीसाठी बदाम, पिस्ते, वेलची पूड, केशर.
कृती : प्रथम एका भांड्यात (पाण्याचा हात न लागता) लिंबाचा रस काढून घ्यावा. तो रस एका वाटीत गाळून घ्यावा. एक वाटी रसाकरता ६ वाट्या साखर घेऊन साखरेचा पक्का पाक करावा. पक्का पाक झाला की, त्यात रस ओतावा.
एक उकळी आली की, चटकन गॅसवरुन पातेले खाली उतरवावे. त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशर काड्या, इत्यादी आवडीप्रमाणे घालावे. सुधारस थंड झाला की, स्वच्छ बरणीत ओतावा.
जेव्हा पाहिजे तेव्हा एका भांड्यात काढून घ्यावा. त्यात सीझनप्रमाणे अननस, केळी, यांचे पातळ काप किंवा आंब्याच्या फोडी (लहान) घालून तो वाटीतून सर्व्ह करावा.
आयते वेळीचे पक्वान्न, पित्तशामक, गुणकारी सुधारस तयार.
सौ.अपर्णा पु.बापट, गिरगांव
जयवंता, सुंदरच रे..
शुभेच्छा!!