पूर्णाहार कोशिंबीर

koshimbir
सौ. माधुरी आनंद देव यांनी तयार केलेली पूर्णाहार कोशिंबीर

साहित्य : 1 जुडी कांद्यांची हिरवी पात, भिजवलेली उडदाची आणि मुगाची डाळ प्रत्येकी 2 चमचे, हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, दाण्याचे कूट, मीठ-साखर, घट्ट दही किंवा अर्ध्या लिंबाचा रस, तेल फोडणीसाठी मोहरी-हिंग आणि हळद, पाव वाटी किसलेले गाजर.

कृती : कांद्याची पात धुवून, बारीक चिरून त्यात दही आणि लिंबू रस न घालता, बाकीचे साहित्य सुरूवातीला घालावे आणि नीट एकत्रित करावे, त्यावर दही किंवा लिंबाचा रस घालून तेलाची फोडणी टाकावी. मिरच्या फोडणीतच टाकाव्यात. पुन्हा एकदा सर्व नीट कालवून घ्यावे.

Madhuri Anand Devसौ. माधुरी आनंद देव
434 शनिवार पेठ
पुणे 411 030

तुम्हीही आपली रेसिपी पाठवू शकता, आपला तसेच रेसिपचा फोटो,कृती आणि साहित्य मेल करा… [email protected] वर

धन्यवाद

Leave a Reply