हळदी गाजराचे भरीत (रायता)

सौ. अनघा निलेंद्र खेर 

Anagha Nilendra kher

साहित्य – तीन ते चार कोवळी हळदी गाजरे, तीन ते चार सांडगे मिरच्या, मध्यम आकाराचे एक वाटी थोडेसे आंबट दही, चवीनुसार मीठ, हवी असल्यास चिमुटभर साखर , दोन टेबल स्पून तेलाची फोडणी, मोहरी, हळद, हिंग

कृती – प्रथम गाजरे धुऊन, चांगली शिजवून घ्यावीत. चार शिट्य़ांपर्यंत शिट्या कराव्यात. थंड झाल्यावर, त्याची साले काढून चार भाग करून अगदी बारीक चिरावी. पळीने थोडीशी चेचावी, म्हणजे छान मिळून येतात. नंतर त्यात मीठ, दही आणि कुस्करलेल्या सांडग्या, मिरच्या घालून गार फोडणी द्यावी.

रंगीत, सुंदर, चविष्ट रायता तोंडी लावणे तयार झाले. हे पोळी-भाकरी बरोबर, पराठ्याबरोबर फारच रुचकर लागते.haldi gajar bharitटिप – फोडणी करताना प्रथम सांडगी मिरच्या तळून घेऊन मग त्यातील फोडणी करावी. वेगळे तेल घेऊ नये. मिरच्या लालसर तळाव्या. जर मिरच्या कुस्करल्या गेल्या नाहीत तर मिक्सरमध्ये अगदी थोडा वेळ घालून जाडसर काढाव्यात. विकतच्या सांडग्या, मिरच्या घेतल्या तर त्यात दही असते.मिरच्या कडक होतात. हाताने चुरल्या जात नाहीत.

feedback – [email protected]

Leave a Reply