सातरस्त्याचं ‘श्रीराम हॉटेल’

Your ads will be inserted here by

Easy Plugin for AdSense.

Please go to the plugin admin page to
Paste your ad code OR
Suppress this ad slot.

vegमुंबईत महालक्ष्मीच्या धोबी तलावापासून दोन मिनिटांच्या अंतरावर, सातरस्ता चौकातून आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे. तुम्ही पहिल्यांदा या हॉटेलात जात असाल तर तुम्हाला विचारावं लागेल, की श्रीराम हॉटेल कुठे आहे.

कारण श्रीराम हॉटेल हे बाहेरून खूप लहानसं दिसतं, श्रीराम दुग्धालय लिहलेला या बोर्ड तसा नजरेला पडत नाही. मात्र तीन फूट रूंद आणि पाच फूंट लांब अशा छोट्याशा बोळीत प्रवेश केल्यावर, तुम्हाला भलं मोठं श्रीराम हॉटेल दिसून येईल. इथं एवढं मोठं हॉटेल आहे, हे बाहेरून कुणीही म्हणणार नाही. एका गुहेत आल्यासारखा तुम्हाला वाटेल.

सकाळची वेळ
kanda poha, kanadapoheश्रीराम हॉटेलमध्ये तुम्ही सकाळी 10 वाजेच्या आधी गेले, तर शेव आणि खोबऱ्याचा किस असलेलं अस्सल चवदार कांदा-पोहे तुम्हाला खायला मिळेल.

यासोबत जर तुम्ही चहा घेतला तर तो चहा तुम्हाला सदैव लक्षात राहणारा असेल. आणि दुध मागितलं तर ते प्लास्टिकच्या पिशवीत मिळणाऱ्या पाश्चराईज्ड दुधासारखं नाही. याची साक्ष तुम्हाला ग्लासमध्ये देण्यात आलेल्या दुधावर आलेली जाडजूड साय नक्की देईल.

Your ads will be inserted here by

Easy Plugin for AdSense.

Please go to the plugin admin page to
Paste your ad code OR
Suppress this ad slot.

सकाळच्या वेळेस आणि दुपारी तीन नंतर तुम्हाला वडापाव आणि समोसा तिखड-गोड चटणीसह मिळेल, चटणी नाही असं कधीही होणार नाही. नुसता कोरडा समोसा तुमच्या प्लेटमध्ये आला असं कधीही इथं होत नाही. सोबत तुम्हाला यातलं काही आवडत नसेल, तर मिसळ-पाव आहेच. हे झालं फक्त नाश्त्याचं…

श्रीराम हॉटेलचं जेवण
sweets, desertजेवणात तुम्हाला फक्त तंदुरी रोटी आहे, कुल्चा आहे, चपाती नाही, असं होणार नाही, तुम्ही मागणी केली, तर तुम्हाला चपातीही मिळू शकते. भाजीत तुम्हाला पनीर कढाईपासून सर्व भाज्या मिळतील, सर्वच भाज्यांची चव इथं लक्षात राहणारी आहे. ‘तुम्हाला मक्के दी रोटी’ आणि ‘सरसोदा साग’ही इथं मिळेल.

पुलाव, व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी याही लक्षात राहणाऱ्या आहेत. एक अख्खी बिर्याणी तुम्ही कधी संपवाल हे तुम्हाला कळणारही नाही. इथला मलाई कोफ्ताही अप्रतिम आहे.

जेवणानंतर तुम्हाला काही तरी गोड खायचं असेल, तर बंगाली स्वीटसने तुमचं तोंड गोड होईल, यात रसमलाईची चव चाखण्यासारखी आहे. एवढं समाधान होऊनही या हॉटेलातील बिल दिल्यावर तुम्हाला समाधानचं वाटेल, कारण तुमचा कुणीतरी खिसा कापला की काय, असं वाटणारे दर या हॉटेलने लावलेले नाहीत.

पत्ता – श्रीराम हॉटेल महालक्ष्मी स्टेशनपासून धोबी तलावावरून खाली सातरस्त्याकडे जातांना पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. ज्या चौकातून सातरस्ते जातात, त्या चौकाला सातरस्त्या म्हणण्यात आलं आहे. त्यातील एक रस्ता आर्थररोड जेलकडे जातो, त्या रस्त्याच्या सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे.

सेंट्रल रेल्वेच्या लोकलवरून तुम्ही येत असाल तर भायखळ्याहून सातरस्त्याला जाणारी बस किंवा टॅक्सी पकडा, सातरस्त्यावर आल्यावर, आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणालाही विचारा, श्रीराम हॉटेल कुठे आहे.

Advertisements