साहित्य : तीन आंबे, तिखट – १ चमचा, भाजून मेथीकूट -१ चमचा, धणे पूड कच्ची – १ चमचा, मिरीपूड लहान – एक चमचा, गूळ लहान वाटी (चिरलेला), मीठ चवीपुरते, नारळाचे दूध
फोडणीचे साहित्य : मोहरी, मेथी, दाणे, तेल
कृती : प्रथम बाठीसकट आंबे कोळून घ्यावे, त्याला धणे पूड, मेथीपूड, तिखट हे सर्व बाठीसकट कोळाला लावावे. एका भांड्यात नारळाचे दूध काढून घ्यावे. त्यात लहान चमचा मिरीपूड घालावी.
नंतर पातेल्यात थोडे तेल घालून भांडे गॅसवर ठेवावे. तेल तापले की, मोहरी मेथी दाणे घालून खमंग फोडणी करावी. त्यात बाठीसकट तयार केलेला कोळ घालावा.
थोडे परतून त्यात मिरी घातलेले दूध (नारळाचे) घालावे. नंतर ढवळून थोडा गूळ घालावा. मीठ घालावे व लगेच खाली उतरवावे. रुचकर रायते खाण्यासाठी तयार.