सातरस्त्याचं ‘श्रीराम हॉटेल’

मुंबईत महालक्ष्मीच्या धोबी तलावापासून दोन मिनिटांच्या अंतरावर, सातरस्ता चौकातून आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे. तुम्ही पहिल्यांदा या हॉटेलात जात असाल तर तुम्हाला विचारावं लागेल, की श्रीराम हॉटेल कुठे आहे. कारण श्रीराम हॉटेल हे बाहेरून खूप लहानसं दिसतं, श्रीराम दुग्धालय लिहलेला या बोर्ड तसा नजरेला पडत नाही. मात्र तीन फूट रूंद आणि पाच फूंट लांब अशा छोट्याशा बोळीत प्रवेश केल्यावर, तुम्हाला भलं मोठं … Continue reading सातरस्त्याचं ‘श्रीराम हॉटेल’

‘सरदार’ची पावभाजी

तुम्हाला सरदारची पावभाजी माहित आहे का? या पावभाजीची ख्याती अख्ख्या दक्षिण मुंबईत आहे. पावभाजीसाठी ‘सरदार हॉटेल’समोर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी रांग लागते. या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक, पण सरदारची पावभाजी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या पावभाजीत तुम्हाला जास्तच जास्त, टॉमॅटो आणि भरपूर बटर एवढंच काय ते ओळखता येईल. ज्यांना पावभाजी आवडते, त्यांनी एकदा तरी मुंबईत आल्यावर ही पावभाजी खाऊन पहायलाच हवी, निश्चितच सरदारची पावभाजी तुमच्या … Continue reading ‘सरदार’ची पावभाजी

‘आनंद भवन’ची मिसळ

लालबागच्या माणसाला भूक लागली आणि त्याला आनंद भवनच्या मिसळीची तलफ लागली नाही, तर समजायचं हा माणूस लालबागमध्ये नवीनच रहायला आला आहे. तलफ अशा अर्थाने की, आनंद भवनची मिसळ तर चवदार आहेच, मात्र आनंद भवनचा चहाही तलफ लावणारा आहे. साठ वर्षांपासून जपलेली चव आनंद भवनने 60 वर्षापासून आपल्या मिसळची चव जपली आहे. आनंद भवनची मिसळ आणि चव जरा हटके आहे. तिखट कमी खाणाऱयांना ही मिसळ जरा … Continue reading ‘आनंद भवन’ची मिसळ

खवय्या गिरगावकर!

(अश्विन बापट) आमच्या ‘एबीपी माझा’वरील’चॅट कॉर्नर’ या एन्टरटेन्मेंट शोसाठी अभिनेता संजय मोने यांना निमंत्रित केलं होतं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तू राहायला कुठे आहेस ? मी म्हटलं, गिरगावात. असं म्हणताक्षणी संजय मोने यांनी गिरगावातले त्यांचे दिवस सांगायला सुरुवात केली. खास करून गिरगावातली खाद्य चळवळ यावर ते भरभरून बोलले. त्यावेळी मीही त्यांच्या त्या खमंग चर्चेच्या वेळी मनाने का होईना अवघं गिरगाव फिरून आलो. प्रत्येक ठिकाणची वेगळी … Continue reading खवय्या गिरगावकर!