मुंबई, परळ | नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती या नॉनव्हेज हॉटेलला जेवायला जाणं एक पर्वणी असते.
इथल्या हॉटेलमधील चिकन मसाला अनेकांची आवडती डीश आहे. या बरोबरचं अंड्यासह मसाला असलेला बैदाही लोकप्रिय आहे.
या मसालेदार चिकन-मटण सोबत मिळणारी रोटीही इथे छानपैकी पूर्ण शेकलेली असल्याने फेमस झाली आहे. पक्के तिखट नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीचं असते.
तुम्हाला मासे खायचे असतील तर माशांवरही ताव मारता येतो.
मात्र इथल्या चिकन आणि मटणाची मजा काही वेगळीच आहे. यासोबत इथली कडक सोलकढी प्यायला विसरू नका.
तिखट आणि मसालेदार चिकन आणि मटण खाणाऱ्यांनी या हॉटेलला जरूर एकदा तरी भेट द्यावी.
पत्ता – आत्मशांती, 6 अे, दु.नं.14, पृथ्वीवंदन सोसायटी, ना.म.जोशी मार्ग, मुंबई 400 013