उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली… इथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि ह्या अस्सल पुणेरी मिसळ (मटकी, पोहे, चिवडा, शेव, तळलेला बटाटा असे सगळेच चविष्ठ पदार्थ असलेली) चे खासियत म्हणजे अमर्यादित कांदा आणि रस्सा तेही फक्त ५० रुपयात. सकाळी ८.३० वाजता सुरु होणारी मिसळ चे पातेले दिवसभरात … Continue reading उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे इथं मिळणाऱ्या कचोरीसाठी. शेगावला गेल्यानंतर शेगाव कचोरी खाण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही. आधी पोटाबा आणि मग विठोबा या म्हणीनुसार, शेगाव रेल्वे स्टेशनवर आलेले भाविक तुटून पडतात ते शेगाव कचोरीवर. पण पुणेकर मात्र खादाडीच्या बाबतीत सॉलीड लकी आहेत. बाहेर जाऊन आज काय खायच?, असा त्यांना … Continue reading पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे  | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड, तुळशी बाग इथली मनसोक्त खरेदी करून झाल्यावर पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर पुणेकर वळतात ते हेरंब हॉटेल मधल्या मिसळीकडे. पत्ता – हेरंब मिसळ, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली वेळ सकाळी ९ दुपारी ३ वाजेपर्यंत रविवारी हॉटेल बंद … Continue reading शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे. मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली जाते. तेव्हा मस्तानीचं सौदर्यं काही औरच असतं. तेव्हा मस्तानी पेय … Continue reading पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

SPDP आणि खास्ताचाट

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत  जरा कमतरतातच जाणवते. अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही पुणेकरांसारखीच भन्नाट नावं. कुठे मिळतं खास्ता चाट? सदाशिव पेठेतल्या नागनाथ … Continue reading SPDP आणि खास्ताचाट

मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली. ’मिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. अप्रतिम चवीबरोबरच ही मिसळ विक्रमासांठी ही नावाजलेली. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर … Continue reading मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

पौष्टीक इडलीचं उदय विहार

स्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’ “बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर ऑर्डर दिलेला पदार्थ येतो. टिळक रोडवरच्या एस.पी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या … Continue reading पौष्टीक इडलीचं उदय विहार