रामनाथ मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे

पुणे हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं हे तर निर्विवाद सत्य आहे. पण त्यातही पूणेरी मिसळ आणि खवय्ये याचं अतूट नातं आहे. या पुणेरी मिसळीचा ऎक वेगळाच चाहता वर्ग आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मिसळी मिळतात पण टिळक रस्त्यावरच्या रामनाथ मिसळीची बात काही औरच.

पन्नास वर्षांची परंपरा

ramnath misalपुण्यातली ही सर्वात जुनी आणि प्रसिध्द मिसळ. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेलं हे दुकान होतं रामनाथ कुमंठेकरांचं पण ४० वर्षां पुर्वी ते विकत घेतलं शांतीलाल खन्ना यांनी. शांतीलाल खन्ना यांनी रामनाथ या नावाबरोबरच मिसळीची गुणवत्ता आणि चव या दोन्ही गोष्टी कायम टिकवून ठेवल्या.

रामनाथ मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे झणझणीतपणा. तिखटासाठी प्रसिध्द असलेल्या या मिसळीने केवळ पुण्यातल्याच नव्हे तर दिल्ली, मुबंई, केरळ आणि त्याचबरोबर परदेशातल्या खवय्यांनाही आकर्षित केलं आहे.

खवय्यांची गर्दी

तळलेले कांदा पोहे त्यावर शेव चिवडा, वाटाण्याचा रस्सा आणि त्यावर कांदा, लिंबू, काय सुटलं ना तोंडाला पाणी? इथं पण ही मिसळ नुसतं तोंडालाच नाही तर नाका डोळ्यांना ही पाणी आणते तेव्हा जरा जपून. रस्सा वाटीत येतो. कमी तिखट, मिडीयम आणि तर्रीबाज तिखट असे तीन रस्सयाचे प्रकार तुम्ही आवडी नुसार निवडू शकता. तर अशी ही मिसळ चापण्यासाठी खवय्यांची रांग लागणं नवीन नाही.

 सेलिब्रिटीजची मांदियाळी

केवळ रामनाथची मिसळ खाण्यासाठी मुद्दाम पुण्यात येणारे अनेक जण आहेत. काहीजण इथली मिसळ पार्सल करून परदेशात ही नेतात. अनेक कलाकार मंडळी ही मिसळीची फॅन आहेत. दादा कोंडके, निळू फुले ते अजय-अतुल पर्यंत अनेक कलाकारांनी या मिसळीचा आस्वाद घेतला आहे. फक्त ३०० स्कवेअर फूटांच्या जागेत असणारं या दुकानातल्या पदार्थांची किर्ती मात्र अफाट आहे.

या वास्तूत जादू

या वास्तूत जादू आहे, त्यामूळे इथला पदार्थ हमखास चांगला होतोच असं रामनाथ मिसळचे रणजित खन्ना म्हणतात. विषेश म्हणजे इथं ४० वर्षां पुर्वीचे आचारी अजून टिकून आहेत. परंतू या मिसळी साठी रांगा लावणारे खवय्ये हेच या मिसळीचे खरे चाहते आहेत.

हे खवय्ये नुसती मिसळ खात नाही, तर तर त्याबरोबर रस्सा ही पितात. मिसळी बरोबरच जर गोल भजी आणि बटाटे वडा याचां उल्लेख केला नाही तर या दोन्ही पदर्थांवर तो अन्याय ठरेल.

गरम गरम टपोरे गॊला भजी आणि मोठ्या आकाराचा बटाटे वडा यांचा तर मोह आवरणं अशक्य. बटाटा वड्यायाच्या आतली भाजी तर अगदीच वेगळी बच्चे कंपनीला हमखास पंसत पडणारी. जर कधी रामनाथ च्या बाहेर रांग लावण्याचा योग आला तर इथली मेन्यू पाटी नक्की तुमचं मनोरंजन करेल.

पाककला निपुण गृहिणीही जेव्हा आपल्या हाताच्या चवीला कंटाळतात, तेव्हा सहकूटंब रामनाथकडे वळतात ’ हे पाटीवरचे मजेशीर वाक्यं तसेच अफालातून मेन्यू खाण्यात रंगत आणतात.

 मेन्य़ू

सुपर, हूप्पर बटाटॆ वडा

तबकडी बजी (बटाटा भजी)

खेकडा भजी ( कांदा भजी)

हमदर्द दहिवडा

जवा मर्द कोल्हापुरी मिसळ

मिसळची ऎका प्लेट चा दर आहे ४० रुपये (2013)

गोल भजी २० रुपये प्लेट तर एका बटाटे वड्याची किंमत आहे १० रुपये.

4 thoughts on “रामनाथ मिसळ

  1. छान सुरुवात. मिसळ हा मराठी माणसाचा विक बिंदू. 😉 …. पुण्यात रामनाथ मिसळ फेमस असेलच पण बाकी ठिकाणी फक्त ऐकीव माहिती असू शकते. अश्या लेखांबरोबरच त्याचे ठिकाण पत्ता दिलात तर अतिशय उत्तम. गुगल महाराज्यांच्या कृपेने नकाशा पण टाकू शकता. अश्या मस्त लेखाला फोटोंचा तडका मिळाल्यास अधिक लज्जत येईल.

  2. व्वा व्वा… हा ब्लॉग आजच सापडला. खाण्यासाठी जन्म आपला हे ब्रीद सदैव पाळत आलोय.. खूप खूप शुभेच्छा आणि मस्त मस्त खादाडीचे अड्डे आम्हाला कळवत रहा.

    (खादाड) सुहास

  3. please provide address of all the hotel or place which you show it make very comfortabel for others to locate the restaurant…
    Thanks

Leave a Reply