मुंबई | काही दिवसांपूर्वी गुगलच्या नव्या एँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमला लस्सी हे नाव देण्यात यावं यासाठी आयआयटी खरगपूरच्या आयआयटीयन्स मोहीम हाती घेतल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेलच.
लस्सीची लोकप्रियता यावरून पुरेशी सिद्ध व्हावी. देशभरात सर्वत्र लस्सीचे अनेकाविध प्रकार मिळतात आणि प्रत्येक ठिकाणाची खासियत आपल्याला त्याची लज्जत चाखल्यावरच कळते. असो आता मुंबईतच अनेक उपनगरांमध्ये लस्सीची खास अशी लोकप्रिय ठिकाणं आहेत त्यासंदर्भातील हा खास लेख.
दादर पूर्वेला कैलाश मंदिरची लस्सी मुंबईकरांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत अढळ स्थान टिकवून आहे. अगदी साध्या पंजाबी लस्सीपासून ते बदामपिस्ती, केशर, महाराजा, सम्राट, मॅगो आणि शुगरफ्री अशा विविध स्वादातली लस्सी इथे उपलब्ध आहे. कैलाशच्या लस्सीचे वैशिष्टये म्हणजे ती इतकी दाट असते की ती चमच्याने खावी लागते. अगदी छोट्य़ाखानी जागेत लोक दाटीवाटीने लस्सीचा आस्वाद घेताना पाहयला मिळते.
दादर पश्चिमेला स्टेशनजवळ श्रीकृष्णची लस्सीही अशीच लोकप्रिय आहे. एका अरुंद बोळवजा जागेत आडव्या बाकांवर लोक लस्सीची चव चाखताना दिसतात.
गोगा डेअरीचे नाव तुम्ही ऐकलं आहे का? नसेल तर सांताक्रूझ पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या अगदी नजीक गोगा डेअरी आहे. गोगाच्या लस्सीची चव एकदा तुम्ही चाखून बघाच. अवघ्या तीस रुपयात अतिशय घट्ट आणि ताजी लस्सी आणि त्यावर चेरी वा क्या बात है…लस्सीचा ग्लास पाहता क्षणीच ती कधी एकदाची संपून टाकतो असं होतं.
विलेपार्ले रेल्वे स्टेशनसमोर पूर्वेला अवघी १६ रुपयात व्हॅनिला, रोझ आणि मॅगो अशी तीन स्वादात लस्सी मिळते. लोक ही लस्सी पिण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. स्वस्त आणि मस्त अशी यथायोग्य ओळख या लस्सीची आहे. विलेपार्ले पूर्वेलाच पणशीकरांकडे मिळणारी मॅगो लस्सी चव आणि दर्जाच्या बाबतीत सरसच म्हणावी लागेल.
मालाड पश्चिमेला एमएम मिठाईवाल्याकडे साधी आणि केशर लस्सी मिळते. एमएम की गाढी लस्सी अशी लाऊडस्पीकरवरुन दिवसभर या लस्सीची जाहिरात सुरु असते. साधारणता तीस ते चाळीस रुपयात मिळणारी लस्सीचं वर्णन लाजबाब या एका शब्दात करावं लागेल.
कांदिवलीला श्रीराम स्वीट्सकडे मिळणारी लस्सीही दर्जाच्या बाबतीत नंबरवन आहे. साधी आणि केशर अशा दोन स्वादात ही लस्सी मिळते.
Reblogged this on Deo Optimo Maximo and commented:
It’s all about my favorite drink Lassi, one of the popular and favorite drinks in India. Enjoy! – Deo.
अरे वा! खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
आता मुंबईला गेल्यावर लस्सी कुठे घ्यायची या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
— देवदत्त