धुळ्याहून नाशिकला जातांना हा साई कार फॅमिली ढाबा लागतो, धुळे ते मालेगाव दरम्यान हा ढाबा आहे. नाशिककडे जातांना धुळ्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर हा ढाबा आहे, तर मालेगावपासून १८ किलोमीटरवर साईकार ढाबा लागतो. मालेगावजवळ देवरपाडे-झोडगे गावाजवळ हा ढाबा आहे.
या ढाब्यावरचं जेवणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण ठरेल, शुद्ध शाकाहारी आणि फक्त कार तसेच बाईक वाल्यांसाठीचं येथे जेवणं दिलं जातं, या ढाब्याचं वैशिष्ठ म्हणजे संपूर्ण नैसर्गिक वातावरणात, खान्देशचं जेवणं तुम्हाला मिळतं.
खापरावरची पुरणपोळी
इथली खापरावरची पुरणपोळी खाण्याची हौस तुम्हाला भागवता येते, ही खापरावरची पुरणपोळी अप्रतिम असते, पुरणपोळी खाल्ल्यावर या पुरणपोळीची चव सदैव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहणार आहे.
सातपुळाच्या पाटोड्या
दुसरा सर्वात महत्वाचा पदार्थ आहे, सातपुळाच्या पाटोड्या, हा खान्देशी पदार्थ खातांना, तुम्ही खान्देशी खाद्य संस्कृतीची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत, येथील पदार्थांमध्ये वापरलं जाणारं साजूक तूप हॉटेल मालकांच्या गाईंच्या दुधापासूनच बनवलेलं असतं. त्यामुळे निर्भेळ साजूक तुपाची गावाकडची चव देखिल तुम्हाला चाखायला मिळतं.
आईस्क्रीमपेक्षाही इथलं दही खाऊन पाहा
या ढाब्यावरचं सर्वात महत्वाचं म्हणजे इथलं दही, तुम्हाला दही खायला आवडतं नसेल तर एक चमचाभर दही तुम्ही इथलं खाऊन पाहा, तुम्ही अख्ख मातीच्या छोट्याशा मडक्यातलं दही संपवल्याशिवाय राहणार नाहीत.
तुम्हाला शेतात आल्यासारखं वाटेल
साईकारढाब्यावर फॅमिलीसाठी वेगळी बसण्याची फार चांगली सुविधा आहे. मुंबई-पुण्यातल्या लोकांना तर ही जागा खूपचं मोकळी वाटते एवढंच नाही तर तुम्हाला शेतात आल्यासारखं वाटेल जेव्हा हॉटेलच्या मागच्या बाजूला तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्याल, तेव्हा या रस्त्याने गेले तर नक्की साई कार ढाब्याला भेट द्या.
या ढाब्यावरील मालकांचं ग्राहकांना त्रास होणार नाही, याकडे खास लक्ष असतं, फोन करून तुम्ही पत्ता विचारला तरी तुम्हाला सहकार्य ते करतील, अगदी तुम्ही ढाब्यावर व्यवस्थित पोहोचेपर्यंत.
पत्ता
साई कार फॅमिली ढाबा
मालेगाव-धुळे दरम्यान,
मालेगावपासून १८, तर धुळ्यापासून ३२ किमी अंतरावर
देवरपाडे गाव, पोस्ट झोडगे
तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
फोन नंबर 02554/265276
मोबाईल नंबर 9960286751 / 9766772324