मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली.

Marathi Misal puneमिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट.

अप्रतिम चवीबरोबरच ही मिसळ विक्रमासांठी ही नावाजलेली. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर असणाऱ्या आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

थोडीशी गोड आणि तिखट असणाऱ्या या मिसळीच्या एका प्लेटमध्ये हमखास पोट भरतं. पुण्यातल्या मिसळीमध्ये या मिसळी ने आपलं वेगळेपण जपलं आणि सिद्ध ही केलं.

मटकी, बटाटा, कांदा पोहे, चिवडा, शेव, ओलं खोबरं आणि कोथींबीर आणि तर्रीचा रस्सा ये सारं पाहून तोंडाला पाणी सूटतं. इथं खव्य्यांना वेगळी चव मिळते पण त्याबरोबरच हा पहिल्यांदा येणारा खवय्या हा नंतर या मिसळीचा नियमित ग्राहक बनतो.
मराठी मिसळ
या मिसळीच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ही मिसळ छोट्या परातीत मिळते, त्यामुळे मिसळ मिक्स करायला ऎसपैस जागाही मिळते. राजकीय नेते, कलाकार, इतिहास संशोधक, तरूण, तरूणी यांचा तर हा फेवरेट मिसळ कट्टा.

रोज ३५० ते ४०० ग्राहक या मिसळीचा आस्वाद घेतात. रविवारी हाच आकडा ५०० ते ६०० च्या घरात पोहचतो. या मिसळी चे मालक आशोक जाधव म्हणतात. आमच्या मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे ती थंड पडल्यावर ही तितकीच चवदार लागते.

जाधव याचं संपूर्ण कुटुंब मिसळ प्रेमींना अप्रतिम चवीची मिसळ देण्यासाठी तत्पर असतं. जाधव यांच्या पत्नी स्वत: मिसळीसाठी मसाले बनवतात. अशोक जाधव यांनी मिसळ बनवण्याचं तंत्र स्वत: विकसित केलं आहे, आणि रोज ते स्वत: ही मिसळ बनवतात, त्यामुळे या मिसळीच्या चवीत कधीच बदल होत नाही.

ही मिसळ खाल्ल्यानंतर नाक आणि डोळ्यातून पाणी ही येणारा नाही, आणि जळजळ होणार नाही. यामुळे पुढ्यातल्या मिसळीच्या प्रत्येक घासाचा आस्वाद ग्राहकांना घेता येतो. यामुळे आबालवृध्द ही मिसळीवर तुटून पडतात.

विक्रमी मराठी मिसळ
चवी बरोबरच अनोखे विक्रम आणि ’मराठी स्कीम’ साठी ही मिसळ प्रसिध्द आहे. २०११ ला भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामान्याच्या वेळी भारताच्या विजया निमित्त मराठी मिसळ एकावर एक फ्री मिसळ देण्यात आली होती. त्यावेळी १५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच मिसळ फ्री ही देण्यात आली. त्या दिवशी हॉटेलच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफिक ही जाम झालं होतं. ही बातमी अगदी साता समुद्रा पार ही पोहचली. सचिन तेंडुलकरच्या महाशतकालाही जाधव यांनी एकावर एक फ्री मिसळ देण्याचा निर्णय घेतला.

याला खवैय्यांनी उदंड प्रतिसाद दिला, ३५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच फ्रि देण्यात आली होती. अशोक जाधवांचा हा उपक्रम एक विक्रमच म्हणावा लागेल. या हॉटेलमध्ये जैन मिसळ ही आहे. या हॉटेल ची आणखी ऎक इंटरेस्टिंग स्कीम म्हणजे इथं येणाऱ्या स्त्रीयांना गजरा ही देण्याची अनोखी मराठी स्कीम इथं आहे.

पत्ता
पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

One thought on “मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

  1. कोल्हापुरी पद्धतीची चमचमीत मिसळ खायची असेल तर मी घेउन आलो आहे एक नवीन ऑप्शन …पुण्यात कोथरूड मध्ये …
    कोल्हापुरात घरी बनावलेल्या मसल्यापासून बनलेली आणि एकदम कोल्हापुरची चव असलेली मिसळ आता कोथरूड मध्ये सुरु केली आहे …
    एकदा अवश्य भेट दया आणि आपला अनुभव सांगा

    पत्ता
    कोल्हापुर मिसळ सेंटर
    यशोमंगल अपार्टमेंट
    शीलाविहार कॉलनी
    किमया होटल आणि सदानंद रेसीडेंसी च्या मधील गल्लित,
    कर्वे रोड
    कोथरूड …

Leave a Reply