(पद्मा शिंदे, कोल्हापूर ) कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते, ती इथली संस्कृती आणि कला – क्रीडा परंपरा…
आखाड्यातला कुस्ती असो किंवा कलाकारांची कला, दोन्ही इथेच अनुभवावं. कोल्हापूर म्हणजे रांगडेपण, मात्र रांगड्या भाषेतही दडलंय अपार प्रेम.
कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरी साज, चप्पल अशा वस्तू जगभरात ओळखल्या जातात. पण त्याचसोबत खास आहे ती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती.
कोल्हापूर म्हटल्यानंतर सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते तांबडा पांढरा रस्सा. खास कोल्हापूरी स्टाइलचं मटण. तांबडा रस्सा म्हणजे फक्त झणझणीत तिखट असा अनेकांचा समज आहे.
थोडं जास्त तिखट आणि वर मिरची टाकली की झाली कोल्हापुरी डिश तयार असा शेट्टी – पंजाबी हॉटेलांनी गैरसमज करुन ठेवलाय. पण कोल्हापुरी जेवण म्हणजे तिखटपणा नाही तर ती एक चव आहे.
दगडी पाट्यावर वाटलेले मसाले वापरुन बनवलेलं झक्कास कोल्हापुरी मटण म्हणजे खवय्यांसाठी एक लज्जतदार ट्रीट. कोल्हापुरात अनेक ठिकाणी अशा लज्जतदार मटणाची चव तुम्ही चाखू शकता.
पद्मा गेस्ट हाऊस, पद्मा हॉटेलमध्ये तुम्ही तिखट नव्हे, तर चमचमीत मटणाचा आस्वाद घेऊ शकता. बाहेर हॉटेलमध्ये मटण खायचं म्हणजे टेन्शनच येतं. पण इथे फ्रेश डिश मिळणार याची खात्री आहे.
खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उत्तम चवीच्या कोल्हापुरी मटणावर ताव मारायचा असेल तर पद्मा हॉटेलला नक्की भेट द्या.
कोल्हापुरात केवळ नॉनव्हेज खाणाऱ्यांचीच चंगळ आहे असं नाही तर शाकाहाऱ्यांसाठीही खूप सारे अॉप्शन इथे आहेत. मिसळीची खरी चव अनुभवायची असेल तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही. इथल्या मिसळीची अनेकांनी कॉपी करायचा प्रयत्न केला, पण इथल्या मिसळीची त्याला सर नाही.
मुंबईमध्ये शेट्टीच्या हॉटेलांमध्ये पांढऱ्या वाटण्यावर फरसाण पापडी टाकून मिसळ म्हणून सर्व्ह केलेल्या डिशला मिसळ म्हणायला जीभ वळत नाही. तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत मिसळ खाण्यासाठी खासबाग हॉटेल, फडतरे आणि चोरगे मिसळ असे काही पर्याय तुमच्यासमोर आहेत.
या तीन ठिकाणच्या मिसळीच्या चवीत थोडाफार फरक आहे पण त्या चविष्ट आहेत हे नक्की. खासबाग मैदान परिसरात गेल्या 70 वर्षांहून अधिक काळपासून खासबाग हॉटेल आहे.
आधी टपरीवजा असणाऱ्या जागेच हॉटेलमध्ये रुपांतर झालं. गेल्या वर्षभरापूर्वी याच जागी नव्याने हॉटेलचा कायापालट करण्यात आलाय. पण चव मात्र तशीच…अगदी काटा किर्रर…
महालक्ष्मी मंदिर परिसरात फिरायला जायचं तर राजाभाऊंची भेळ ठरलेली. संध्याकाळी राजाभाऊंच्या भेळच्या स्टॉलवर असणारी गर्दीच या भेळीच्या चवीची महिती सांगते.
राजाभाऊंच्या पुढच्या पिढ्यांनीही हाच व्यवसाय पुढे सुरु ठेवलाय. मिरची आणि कैरीच्या जोडीने या भेळीची चव आणखी वाढते. रंकाळ्यावर अनेक भेळीच्या गाड्यांवर राजाभाऊ भेळच लिहिलेलं दिसेल.
मात्र याबद्दल विचाराल तर भेळवाला काहीही न बोलता फक्त हसेल हे नक्की. महालक्ष्मी मंदिर परिसरातली खाऊ गर्ल्ली आता केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात थाटण्यात आलीये. इथे या चमचमीत भेळीची चव तुम्ही चाखू शकता.
एक ना दोन अशा अनेक पदार्थांची यादी इथे देता येईल. पण आज इथेच थांबते कारण लिहितानाही ती चव आठवून तोंडाला पाणी सुटतंय.
कोल्हापुरी जेवणाची चव तुमच्या जिभेवर खूप काळ रेंगाळत राहाते. तुम्ही खवय्ये असाल तर कोल्हापूरला नक्की भेट द्या.
‘तुमच्यासाठी काय पण’ ही कोल्हापुरी आदरातिथ्याची रित. त्यामुळे इथली अनेक हॉटेल्स तुमच्या सेवेसाठी नेहमी तयार आहेत. शेवटी जो चवीने खाणार त्याला कोल्हापुरी मानवणार.
(पद्मा शिंदे, ‘एबीपी माझा’च्या पत्रकार आणि अँकर आहेत)
कोल्हापूरची खाद्ययात्रा ओपल शिवाय कशी काय पूर्ण होऊ शकते? ओपल ला एकदा तरी जातोच मी.
बाकी कोल्हापूरची शिळ्या मटनाच्या रश्शायतली मिसळ खाऊन पहा एकदा 🙂
कोल्हापूरी खाद्ययात्रा बरीच मोठी अाहे..पण सगळंच एका वेळी इथे मांडणं शक्य नाही. आह, शिळ्या मटणाला तर तोडच नाही.
OM MI KOLHAAPURA CHI AAHE CHAALISA PEKSHAA JAASTA VAESHA KOLHAAPURA YETHE RAAHATA AAHE
वसुधाजी, पद्मा, आणि महेंद्र आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
OM AGADI GOKULA HOTELA S.T.SYMTA HOTA TE PADADE LAAVUNA ASAAYACHE AATAA KAACHAA VA POSHA AAHE 1967 SAALA CHI GOSHTA GOKULA HOTELA CHE TYAAVELECHE PHOTO ASATILA TARA PAAHANYAASA MILATILA AATAA BADALA PAAHUNA MAJAA VAATATA AAHE
OM KOLHAPURA YETHE RAAJAABHAAU BHELA MI PANA PUSKAL VELAA KHAALI AAHE BHAVAANI MAMDAPA MADHYE CH GAADI ASE
OM MAAJHAA BLOGA LAA POSTA AMERIKAA TAPAALA YAALAA Like keleta bloga baghataa yaa baddaala abhinamdana v aapalyalaa shubhechchaa