ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’

butermilk-1
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये मिळणार ताक

स्वप्नाली अभंग : आरोग्याच्या दृष्टीने ताक अतिशय उत्तम, हे वेगळं सागांयची गरज नाही. ताकाला तर पृथ्वीवरचं अमृत म्हटलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, ताकात अशी काय व्हरायटी आहे, एवढं ताक पुराण कशासाठी, तर याचं उत्तर तुम्हाला हे ताक पुराण वाचाल्यानंतर मिळेल.

लाकडाच्या रवीने घुसळलेलं आबंट मधूर ताक उन्हाळ्याच्या दिवसात क्षीण घालवण्यासाठी मदत करतं. हल्ली डायट कॉन्शस लोक वाढल्यामुळे बटर मिल्क म्हणजेच ताक हॉटेलांमध्येही सहज मिळतं. पण हे ताक असतं मिक्सर किंवा इलेक्ट्रिक रवीने तयात केलेलं.

कधी कधी खूपच आबंट, तर कधी कधी मसालाच्या ताकच्या नवाखाली झणझणीत मिरच्या टाकलेलं. पण मुबंई-गोवा महामार्गावरचं कर्नाळा अभायारण्याजवळचं ‘क्षणभर विश्रांती’ मधलं ताक खरोखर इथं घेतलेली विश्रांती सार्थ ठरवते आणि प्रवासाचा क्षीण ही कमी करते.

लाकडी रवीने घुसळलेल्या या ताकातल्या मीठ आणि जिरेपूडच्या चवीने ताक पिण्याचा आनंद द्वीगुणीत होतो. ऑर्डर प्रमाणे ताक तुमच्या समोरच घुसळं जातं. ताजं ताजं आणि मधुर या वैशिष्ट्यामुळे हे ताक प्रसिध्द आहे.

या हॉटेलात बारा महिने ताक, मटका दही, खरवस, लस्सी या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी असते. याशिवाय थंडाई फूल, मसाला ताक हे पर्याय ही आहेत. इथलं हॉट मिल्क ही अप्रतिम. दुधाला नाकं मुरडणाऱ्या मंडळीने इथं एकदा नक्की यावं.
1984 पासूनची परंपरा
क्षणभर विश्रांती या मिल्क प्रोडक्ट हॉटेलची सुरवात सुहास सामांत यांनी १९८४ साली केली. तेव्हा हे मुबंई गोवा महामार्गावरील ऐकमेव हॉटेल होतं. स्वच्छता आणि उत्कृष्ट प्रतीचे दुधाचे पदार्थ त्यात निरनिरळी व्हरायटी यामूळे मुबंई गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती ही होतेच.

या हॉटेलच्या स्वत:च्या ५० म्हशी आणि १० गाई आहे. त्यामुळे दर्जाबाबात नो क्वेश्चन अ‍ॅट ऑल. माझ्या मामाच्या गावीही दुध दुभतं भरपूर असायचं. ताक मातीच्या रांजणात घुसळलं जायचं आणि आम्हा बालचमूला गरम गरम भाकरी आणि ताक दिलं जायचं. आज जरी ताक भाकरी हा पदार्थ ऑड वाटत असला तरी अजुनही ताक भाकरीची चव जिभेवर रेगाळतेय.

7 thoughts on “ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’

  1. भगत ताराचंद मध्ये बियर बाटली सदृश्य बाटलीतून मिळणाऱ्या ताकाची आठवण झाली.

    1. भगत ताराचंद च् बियर बाटली सदृश्य बाटलीतून मिळणार ताक हि मस्त आहे. पण त्या बाटलीचे मात्र उगीचाच दडपण येते.

    2. भागत ताराचंद च बियर बाटली सदृश्य मिळणार ताक हि मस्त आहे. पण ती बाटली पाहून उगीचच दडपण येतं.

  2. वसुधाजी तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप सारे धन्यवाद, तुमचा ब्लॉग पाहिला, या वयातही तुम्ही ब्लॉग लिहिता हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
    तुमच्या आयुष्यातला अनुभवाचा ठेवा, पुढच्या पिढीसाठी सतत उपलब्ध राहणार आहे.

  3. अनुविना, तुमच्या सततच्या प्रतिक्रियांमुळे आमच्या ब्लॉगमध्ये जिवंतपणा येतो,
    खूप सारे धन्यवाद…!

Leave a Reply