<b>MyCityMyFood.com | Mumbai</b>
प्रताप लंच होम दक्षिण मुंबईत हुतात्मा चौक म्हणजे फ्लोरा फाउंटनपासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. फूड लव्हर्सचं हे लोकप्रिय ठिकाण आहे. सी फूड ज्यांना आवडतं त्यांनी एकदा तरी या हॉटेलला भेट द्यावी असं हे हॉटेल आहे.
प्रताप लंच होम हे मुंबईतलं पहिलं मंगलोरीयन सी फुड रेस्टॉरंट म्हणूनही ओळखलं जात आहे. प्रताप लंच होमच्या स्थापनेला ५० पेक्षा अधिक वर्ष झाले आहेत.
प्रताप लंच होमची स्थापना 1961 साली झाली आहे. सर्व प्रकारच्या सी फूडसाठी या हॉटेलची ओळख आहे. मंगलोरीयन, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, मोगलाई तसेच चायनीज डिशेसचाही यात समावेश आहे.
हे रेस्टारंट वातनुकुलित (एसी) आहे, यात मंद आवाजात वेस्टर्न आणि क्लासिकल म्युझिक सुरू असल्याने वातावरण अधिकच उल्हासित असतं.
जेवणासाठी कुटुंब आणि मित्रांबरोबर डिनर घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. यासोबत बिअर, विस्की, वाईनची सेवाही येथे देण्यात येते.
प्रताप लंच होमच्या काही लोकप्रिय डिशेस आहेत. यात हरियाली क्रॅब मिट, तंदुरी क्रॅब, गास्सी क्रॅब, फिश तवा फ्राय, किंग प्राव्हन्स गास्सी, पांमफ्रेट बटर पीपर, आणि प्राव्हन्स चिली रोस्टही यात लोकप्रिय आहे.
सी फूड लव्हर्ससाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे, दोन जणांसाठी जास्तच जास्त ६०० ते हजार रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो (year-2014).
वेळ सकाळी ११ ते रात्री 12.30 पर्यंत
पत्ता – प्रताप लन्च होम
शॉप नं 79, जन्मभूमी मार्ग,
फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र, पिन 400 001
फोन :022 2287 1101
पाहा प्रताप लंच होमचा व्हिडीओ