‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

सीएसटी स्थानकासमोरचं आराम हॉटेल
सीएसटी स्थानकासमोरचं आराम हॉटेल

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकासमोर आराम नावाचं मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध् हॉटेल आहे.

या हॉटेलच्या बाहेर आराम वडापाव नावाचा स्टॉल लावण्यात आला आहे.

या स्टॉलवर मुंबईकरांसह काही परदेशी पर्यटकही वडापावचा आस्वाद घेतांना दिसून येतात.

आराम हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व मराठी पदार्थांची चव घेता येते. यात बासुंदी पुरीपासून उपवासाचा फराळही उपलब्ध आहे.

मिसळ पाव, पियुष, मसाला दुध, कोल्हापुरी मिसळ, दही खिचडीही येथे मिळते, उन्हाळ्यात कैऱ्हीचे पन्हे मिळते.

उन्हाळ्यात अनेक वेळा हे पन्हे कधीच संपलेले असते. उन्हाळ्यात पन्ह्याची मागणी वाढते.

राजगीरा पुरीला ही अनेक जण उपवासासाठी प्राधान्य देतात. इथला चहाही अप्रतिम असतो.

सीएसटीच्या एवढ्याजवळ असल्याने या दुकानात नेहमीच गर्दी असते, 1941 पासून हे हॉटेल आजही सुरू आहे. आपली चव कायम राखून आहे.

सीएसटी स्थानकातून पश्चिमेकडे जाणाऱ्या बोगद्यातून वर आल्यावर तुम्हाला आराम हॉटेल दिसेल.

One thought on “‘सीएसटी’समोर ‘आराम’चा ‘वडापाव’

  1. वडापाव म्हणजे सुख… असंच बोरीवलीला मंगेश वडापावच्या दोन गाड्या लागतात… एक स्टेशनजवळ हॉटेल राजमहलच्या इथे आणि एक बाभई नाक्याला आत CCD समोर. नक्की ट्राय करा. अगदी अल्टीमेट चव…

Leave a Reply