पूर्णाहार कोशिंबीर

koshimbir
सौ. माधुरी आनंद देव यांनी तयार केलेली पूर्णाहार कोशिंबीर

साहित्य : 1 जुडी कांद्यांची हिरवी पात, भिजवलेली उडदाची आणि मुगाची डाळ प्रत्येकी 2 चमचे, हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, दाण्याचे कूट, मीठ-साखर, घट्ट दही किंवा अर्ध्या लिंबाचा रस, तेल फोडणीसाठी मोहरी-हिंग आणि हळद, पाव वाटी किसलेले गाजर.

कृती : कांद्याची पात धुवून, बारीक चिरून त्यात दही आणि लिंबू रस न घालता, बाकीचे साहित्य सुरूवातीला घालावे आणि नीट एकत्रित करावे, त्यावर दही किंवा लिंबाचा रस घालून तेलाची फोडणी टाकावी. मिरच्या फोडणीतच टाकाव्यात. पुन्हा एकदा सर्व नीट कालवून घ्यावे.

Madhuri Anand Devसौ. माधुरी आनंद देव
434 शनिवार पेठ
पुणे 411 030

तुम्हीही आपली रेसिपी पाठवू शकता, आपला तसेच रेसिपचा फोटो,कृती आणि साहित्य मेल करा… mycitymyfood@gmail.com वर

धन्यवाद

हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ

स्वप्नाली अभंग/ पुणे

चार्तुमास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. उपावास आणि सात्विक भोजना मुळे आपोपच खाण्यावर काही बंधन येतात. पण खाणं आणि पुणं हे समीकरण भारतातच नाही तर जगप्रसिध्द आहे. त्यातून मिसळ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. पण उपवासाच्या दिवशी मिसळीला आवर घालणं तसं जरा कठीणच नाही का? लालभडक तर्री असलेली मिसळीची प्लेटसमोर आली तरी ती खाण्याचा मोह होतोच.

नाही नाही उपवास मोडण्याच महापाप अजिबात करू नका. उपवासाच्या दिवशी लाल तर्रीची मिसळ खाण्याचा मोह झाला तर पुण्यातलं थेट हिराबाग चौक गाठा. टिळक रोड नजीक असणारा हिराबाग चौक तसा फेमस.

Image

इथल्या खाऊ गल्लीत सकाळच्या न्याहारीसाठी जाम झूबंड उडते. इथं तुम्हाला अमित स्टॉलवर लाल तर्रीची उपवासाची मिसळ मिळेल. काय झालात ना खूश. अहॊ ’पुणे तिथे काय उणे’ ही म्हण काय उगाचच आहे काय?

 साबुदाण्याची खिचडी, बटाटयाची भाजी, अख्या शेंगदाण्याची लालभडक आमटी, बटाटाच्या तिखट चिवडा. बटाटाच्या शेव आणि शेंगदाणे वाटून तयार केलेली गोड आमटी काय हुआ ना दिल खूश. मी तर म्हणते या मिसळीसाठी उपवासची वाट कशाला बघायची. लिहितानाच ( आय मीन टू से टाईप करताना)  तोंडाला पाणी सुटतयं तर वाचताना किती सुटेल. याचा विचार तुम्हीच करा.

या स्टॉल वर मिळणाऱ्या उपवासाच्या सगळ्याच पदार्थांवर खव्वयांच्या उड्या पडतात. उपवास असो किंवा नसो. त्यातून उपवासाची मिसळ म्हणजे अनेकांची फेवरेट. या मिसळीचे जनक अमित खिलारे यांना खाण्यात काहीतरी नवीन प्रयोग करायचा होता. खिचडीत उसळ टाकून केलेली मिसळ सगळ्यांनाच आवडली. नवरात्रात इथं मिळणारी उपवासाची थाळी ही अप्रतिम असते. या व्यतिरिक्त उपवासाची भेळ. वडा सांबार पॅटिस (उपवासाचेच बरं का), खिचडी काकडी पदार्थ मिळतात.

आता मला कळलं एकादशी आणि दुप्पट खाशी का म्हणतात ते.

प्रकाशचा साबुदाणा वडा

साबुदाणा वडा
दादरच्या प्रकाश हॉटेलचा प्रसिद्ध साबुदाणा वडा

प्राजक्ता धर्माधिकारी-कुंटे, मुंबई | दादर… मुंबईतलं प्राईम लोकेशन…. मुंबईत राहणारा प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या निमित्ताने दादरमध्ये येतच असतो.

दादरमध्ये खरेदी, फिरणं, खाणं, पिणं सगळंच चालतं. त्यातीलंच खाण्याची काही मोजकी मराठमोळी ठिकाणं आजही जोमात सुरू आहेत. त्यामध्ये प्रकाशचं नाव आलं नाही तरचं नवल.

मराठी माणूस तसा फार चोखंदळ पटकन कोणत्याही गोष्टीला सर्टिफिकेट देणार नाही, पण अनेक वर्षाची परंपरा जपत आणि तीच चव टिकवत प्रकाशने आपलं स्थान लोकांच्या मनात आणि जिभेवर कायम राखलं आहे.

प्रकाशचा साबुदाणा वडा हा मराठी असो, वा अमराठी लोकांसाठीही जिभेवरची चव आहे.  तिथे तुम्ही कधीही जा वेटिंग असणारंच. साबुदाणा वडा आणि त्या सोबत असणारी दाण्याची चटणी, ही चव मी या आधीही कधी घेतली नव्हती, आणि ही चव दुसरीकडे कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे.

साबुदाणा वडा अनेक ठिकाणी मिळतो, पण त्याला चव प्रकाशच्या वड्याला नाही. उपवासाच्या दिवशीतर घरात वेगवेगळे पदार्थ करण्यापेक्षा प्रकाशमधून, पार्सल घेऊन येण्याला किंवा तिथेच जाऊन खाण्याला अनेक जण प्राधान्य देतात.

आषाढी एकादशी, महाशिवरात्री या उपवासाच्या दिवशीतर चक्क प्रकाशमध्ये पाटी लिहिलेली असते, उपवासाच्या पदार्थांशिवाय काहीही मिळणार नाही. मग काय ही मोठी रांग लागते खवय्यांची. साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, बटाटा पुरी, भगर, आणि स्विट डिश म्हणून थंडगार पियुष.

प्रकाशचा बटाटा वडा ही इतरांपेक्षा वेगळी टेस्ट असलेला. गरमा गरम आणि चविष्ट. आळुवडी, कोथिंबीरवडी, मिसळ… असे अगदी मराठमोळे पदार्थ असूनही प्रकाशचा बिझनेस फुल्ल चालतो.

परदेशात असलेले दादरकरही घरी आल्यावर प्रकाशला आवर्जुन भेट देतात. हेच तर प्रकाशचं यश आहे. म्हणतातना कोणाच्याही मनात जाण्याचा मार्ग पोटातून जातो. तसं प्रकाशने त्यांच्या ग्राहकांच्या मनात अढळ असं स्थान निर्माण केलं आहे.

अनेकांचं म्हणण असतं मराठी माणसं बिझनेसमध्ये कच्ची असतात त्यांना तो जमत नाही पण प्रकाश याला अपवाद आहे. प्रकाशचं स्थान कायमच अढळ राहील.

कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू
राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू

सचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ आणि आपल्या राजाभाऊंची नाद खुळा भेळ….

ताबंडा- पांढरा रस्स्याचा स्वाद चाखायचा आहेच, (म्हणजे इथं तो फक्त वाचता येईल), पण त्याआधी आपण राजाभाऊंच्या भेळबद्दल बोलू.

कोल्हापुरात या आणि कुणालाही विचारा,  “भावा राजाभाऊची भेळ कुठं रे”? मग लगेचच तुम्हाला ढगाएवढे हात करून, त्या दिशेकडे हात दाखवून आणि भावाच्या सादेला त्याच प्रेमाने साद देत, पत्ता सांगितला जाईल.

तर राजाभाऊची भेळ पूर्वी भवानी मंडपात सुरू झाली होती. आता ती केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाजवळ आहे. जागा बदलली असली, तरी चव तीच आहे. बऱ्यापैकी मोठा गाडा, पांढरे शुभ्र कपडे घातलेले कर्मचारी आणि गाड्याभोवती जमलेली गर्दी, असा राजाभाऊ भेळचा लवाजमा.

राजाभाऊंच्या भेळबद्दल प्रत्यक्ष मी पामराने काय सांगावं?  जावं आणि खाऊन यावं, एवढं साधं वर्णन करता येईल.

तिथे गेल्या गेल्या चुरूचुरू कांदा चिरणारे कर्मचारी, आणि गर्दीला त्याच कौशल्याने हाताळणारे रविंद्र बापू दिसतील. रविंद्र बापू हे राजाभाऊंचे चिरंजीव. त्या गर्दीतूनच, दादा, ताई या, कोणती भेळ देऊ, किती (क्वॉन्टीटी) हवी, वगैरे हे आपुलकीने विचारणं आलंच.

पण जास्त लक्ष वेधून घेतं, ते वाऱ्यावर उडणाऱ्या गवताच्या पात्याप्रमाणे, चलाखीने हलणारे त्यांचे हात. इतक्या वेगाने हलणारे हात, इतकी रुचकर, स्वादिष्ट भेळ कशी काय बनवू शकतात?, हा सुद्धा एक प्रश्नच उद्भवतो.

भेळीचा एक घास तोंडात घातल्यानंतर, तो कधी खाल्ला जाईल, आणि दुसरा घास कधी घेऊ, याची गडबड मनात झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी.

प्रत्येक ठिकाणच्या भेळीचं असं वैशिष्ट्य असतंच, तसं या भेळीचंही आहेच. पण हे ज्याने-त्याने खावं आणि आपापलं असं वैशिष्ट्य ठरवून टाकावं….

या मग एकदा कोल्हापूरला आणि राजाभाऊंची भेळ खाऊन पाहाच…

Aditi Restaurant

Aditi Restaurant
Aditi Restaurant near KEM hospital

Mandar Purkar | Mumbai |Aditi Restaurant which is in midst of a raging controversy thanks due to Narendra Modi’s tweet is actually famous for its mouth watering delicacies.

The owners of the restaurant to highlight the imposition of service taxes creatively used bills issued to customers by criticizing the UPA government responsible for the scams. The Congress party workers staged dharnas outside the hotel to protests and the owners had to stop using bills to criticize the government.

But if somebody thinks that owners used this as a ploy to attract the controversy and to further the commercial interests by seeking attention then they are wrong. Actually Aditi is jam-packed throughout the day.

Aditi has huge patronage of the customers not only due to its prime location but also due to its quality and taste. The restaurant is clean and adheres to high standard of hygiene and cleanliness as it is dependent upon the staff of the KEM Hospital for business.

The restaurant serves South Indian and Punjabi food and once you taste their vegetables you will crave for more. The gravy of the vegetable is rich and thick, the use of spices is perfect not too spicy or too mild and it’s the perfection of the preparation that is its strength.

The same is the case of its rotis and all other Indian breads. The rotis are crisp and literary melt in the mouths. The rice preparations like biryani and pulao are also up to mark. The service is quick and attentive and it’s no wonder that you have to wait in the queue in the evenings. Once you taste the food of Aditi over a period of time it becomes an addiction.

केईएम हॉस्पिटलसमोरचं ‘आदिती हॉटेल’

vegमुंबई | आदिती हॉटेल हे शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. आदिती हॉटेल हे मुंबईतील परळ भागात आहे. केईएम हॉस्पिटलच्या पश्चिम बाजूच्या गेटसमोर आदिती हॉटेल आहे.

Aditi Restaurant
Aditi Restaurant near KEM hospital

केईएम हॉस्पिटलच्या गेटसमोर रस्ता ओलांडल्यानंतर, म्हणजे हाकेच्या अंतरावर आदिती हॉटेल आहे, या हॉटेलपासून केईएम, टाटा, जेराबाई वाडिया हॉस्पिटलजवळ असल्याने, हॉटेलात डॉक्टरांचं जेवणासाठी येणं जाणं मोठ्या प्रमाणावर असतं.

हॉटेलचा पोटमजला हा वातानुकूलित आहे. तर खालील भाग हा मोठा आणि साध्या वातावरणात आहे. हॉटेलच्या उजव्या बाजूला जमिनीशी लागून गॅलरीसारखा भाग आहे. या गॅलरीत बसणंही खवय्ये पसंत करतात.

आदितीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठ म्हणजे चविष्ट जेवणं, आणि सर्व्हिस. ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर येण्यास उशीर झाला असं कधीही होत नाही. आदितीमधील जेवण संपल्यानंतर आईस्क्रीम खाणं कुणीही विसरत नाही.

सहसा आदितीच्या काऊन्टरवरून बिल घेऊन आदितीच्या बाहेरचं असलेल्या आइस्क्रिम स्टॉलवर हे बिल दिलं की, बाहेर उभं राहूनचं तुम्हाला आईस्क्रिमची चव चाखता येते. हे आइस्क्रिमही वैशिष्ठपूर्ण आहे.

Friends Union Joshi Club

Mumbai | (South Mumbai) Kalbadevi, old locality once the nerve centre of textile trade in India where many popular eating houses are located has Friends Union Joshi Club it’s also famous by its short form FUJC

friends_union_joshi_clubIt was started by Joshi a freedom fighter when his soda factory was confiscated by British government and he came to Mumbai is search of work. In forties Mumbai had became headquarter of Congress party and somebody suggested Joshi to start an eating house to feed party workers coming from all over India.

In the next few years FUJC became a place known for its sumptuous Guajarati thali. Over a period of time due to its quality food, impeccable service and delicious taste FUJC was one of top thali serving restaurant and it is said that even the Dhirubhai Ambani in his initial days used to visit this place to taste its thali.

FUJC was famous for its RasPuri and they took care to naturally ripen the mangoes and never used any chemicals. Today FUJC has lost its aura but then also it serves thali at very reasonable price.

Times change and now there are many options regarding cuisines and youngsters prefer fast food but then also this thali joint has tried to retain its origin menu despite facing many difficulties including inflation.

FUJC has survived more than seventy years and its management has also changed and many old restaurants in the city are closing down but it has managed to stay afloat.

Friends Union Joshi Club serves unlimited thali at Rs 150 on weekdays and at Rs 200 on Sundays with sweets.

The thali consists of unlimited phulkes, three vegetables, dal, rice with accompaniments like pickle, papad, chutneys, farsan and limited sweet on weekdays. The service is fast and courteous.

सुधारस

alphonso mango pickleसाहित्य : ६ मोठी कागदी लिंबे (रसदार), साखर, सजावटीसाठी बदाम, पिस्ते, वेलची पूड, केशर.

कृती : प्रथम एका भांड्यात (पाण्याचा हात न लागता) लिंबाचा रस काढून घ्यावा. तो रस एका वाटीत गाळून घ्यावा. एक वाटी रसाकरता ६ वाट्या साखर घेऊन साखरेचा पक्का पाक करावा. पक्का पाक झाला की, त्यात रस ओतावा.

एक उकळी आली की, चटकन गॅसवरुन पातेले खाली उतरवावे. त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशर काड्या, इत्यादी आवडीप्रमाणे घालावे. सुधारस थंड झाला की, स्वच्छ बरणीत ओतावा.

सौ.अपर्णा पु,बापट, गिरगाव
सौ.अपर्णा पु,बापट, गिरगाव

जेव्हा पाहिजे तेव्हा एका भांड्यात काढून घ्यावा. त्यात सीझनप्रमाणे अननस, केळी, यांचे पातळ काप किंवा आंब्याच्या फोडी (लहान) घालून तो वाटीतून सर्व्ह करावा.

आयते वेळीचे पक्वान्न, पित्तशामक, गुणकारी सुधारस तयार.

सौ.अपर्णा पु.बापट, गिरगांव

Sardar of Pav Bhaji

MUMBAI : It’s very rare that a person residing in South Mumbai has not heard the name of Sardar Pavbhaji. Sardar is considered as a pioneer who introduced pav bhaji to Mumbaikars.

It was in the late sixties that Sardar was the first one to introduce this delicacy and it was no wonder that it spread like a rage. Sardar Pav Bhaji

The street food culture in Mumbai is unique as the rich and famous have always patronised it.

Mumbai has a rich street food culture the rich and famous try it for its taste while the poor ones to fill their stomach. For Sardar there was no looking back and every Saturday and Sunday people started queing up outside the restaurant.

The specialty of this pavbhaji is its spicy taste and with it comes lots of butter. So when you taste the spicy buttery bhaji with soft pav its sheer bliss.

After serving the Mumbaikars for last four decades Sardar has maintained amazing consistency in its taste and quality. The pav or bread which is served with the bhaji is also of high quality and its literary dipped in butter.

So when you visit Mumbai central railway station or Taddeo area dont miss the opportunity to taste the best pavbhaji.

It’s a worth experience which you will remember for ever. Address: 166 B,M,Malviya Marg, Taddeo Tulsiwadi, Near Vasanrao Naik Chowk Mumbai Maharashtra 400 034.

पिकलेल्या हापूस आंब्याचे रायते

Alphansoसाहित्य : तीन आंबे, तिखट – १ चमचा, भाजून मेथीकूट -१ चमचा, धणे पूड कच्ची – १ चमचा, मिरीपूड लहान – एक चमचा, गूळ लहान वाटी (चिरलेला), मीठ चवीपुरते, नारळाचे दूध

फोडणीचे साहित्य : मोहरी, मेथी, दाणे, तेल

कृती : प्रथम बाठीसकट आंबे कोळून घ्यावे, त्याला धणे पूड, मेथीपूड, तिखट हे सर्व बाठीसकट कोळाला लावावे. एका भांड्यात नारळाचे दूध काढून घ्यावे. त्यात लहान चमचा मिरीपूड घालावी.

सौ.अपर्णा पु,बापट, गिरगाव
सौ.अपर्णा पु,बापट, गिरगाव

नंतर पातेल्यात थोडे तेल घालून भांडे गॅसवर ठेवावे. तेल तापले की, मोहरी मेथी दाणे घालून खमंग फोडणी करावी. त्यात बाठीसकट तयार केलेला कोळ घालावा.

थोडे परतून त्यात मिरी घातलेले दूध (नारळाचे) घालावे. नंतर ढवळून थोडा गूळ घालावा. मीठ घालावे व लगेच खाली उतरवावे. रुचकर रायते खाण्यासाठी तयार.

 

पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे.gujar bajirao mastani pune

मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली जाते. तेव्हा मस्तानीचं सौदर्यं काही औरच असतं. तेव्हा मस्तानी पेय आवडलं नाही, असं सांगून गुस्ताखी करणारा एकही पुणेकर तुम्हाला शोधून सापडणार नाही.

मस्तानी तुम्हाला चमचा अथवा स्ट्रॉने ही खाता येते. यातील एक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. बाजीराव पेशव्यांचं मन मस्तानीनं जिकंल होतं. त्याप्रमाणे नव्वद वर्षांपासून पुण्याच्या खवय्यांच्या मनावर गुर्जर पेठेतल्या मस्तानीनं अधिराज्य गाजवलं आहे.

गुर्जर मस्तानी
पुण्यातील गुर्जर मस्तानी हाऊसमध्ये मस्तानी नांदतेय. मस्तानीच्या चवीचं सौदर्य़ं मनामनात खऱ्या अर्थानं गुर्जर मस्तानीने रूजवलं. मस्तानीची मुहूर्तमेढ बाबुराव गुर्जर यांनी 1923 साली रूजवली. बुधवार पेठेत हे मस्तानी गुर्जर हाऊस आहे.

मस्तानी विविध फ्लेवर्समध्ये मिळते. बटरस्कॉच, पिस्ता, आंबा, मलाई, कॉफी आणि कॉफी चॉकलेट अशा अनेक प्रकार उपलब्ध आहेत. थंडाई आणि खस या जराशा हटके मस्तानीही आहेत.

बाजीराव मस्तानीची बातच न्यारी
बाजीराव मस्तानी या मस्तानीची तर बातच न्यारी. या मस्तानीला सर्वाधिक मागणी असते. मस्तानी बरोबरच इथली कुल्फी आणि फालुदेही अप्रतिम. वैविध्यपूर्ण फ्लेवर्स आणि ताजेपणा यामुळे गुजर मस्तानी आजही ग्राहकांचा विश्वास टिकवून आहे.

गुर्जर मस्तानीच्या शाखा
या मस्तानीच्या हडपसर, सातारा रोड आणि बुधवार पेठ या ठिकाणी शाखा आहेत. पुण्यामुबंई बरोबरच चेन्नई आणि बंगलोर येथेही मस्तानीला प्रचंड मागणी आहे. तिथे खास आइस बॉक्समधून मस्तानी पाठवली जाते.

मस्तानीच्या किंमती ही जवळपास ६५ पासून सूरु होतात. काही ठिकाणी फुल आणि हाल्फची सोय आहे. पण मसतानीच्या एका ग्लासात पोट ही भरतं आणि मनं ही तृप्त होतं.  म्हणूनच पुण्यात आल्यावर मस्तानी तर मस्ट है बॉस.

SPDP आणि खास्ताचाट

khasta chat, SPDP
खास्ता चाट

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत  जरा कमतरतातच जाणवते.

अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही पुणेकरांसारखीच भन्नाट नावं.

कुठे मिळतं खास्ता चाट?

सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ, राहळकर राम मंदीराच्या अगदी शेजारीच असणाऱ्या स्वामिनी चाट सेंटरमध्ये खास्ता चाट मिळतं.

‘खास्ता चाट’ हे या चाट सेंटरचे चाट पदार्थांमधलं नवीन इनोव्हेशन. या इनोव्हेनला ग्राहकांचा प्रतिसाद तुटून पडण्याइतका.

खास्ता चाटमध्ये खास्ता पुऱ्या म्हणजे खरपूस, अनेक पदर असलेल्या खाऱ्या पुऱ्या आणि रगडा, चिंच, पुदीनाच्या चट्ण्या, पाणी पुरीच पाणी, ताजं दही टाकून केलेलं अनोखं कॉम्बिनेशन असतं. या खास्ता चाटची क्वॉनटीटी ही पोट भरेल इतकी.

या खास्ता पुरीला गुजराती आणि पंजाबीत मट्टी पुरी तर सिंधीत खास्ता असं म्हणतात. मराठीत या पुरीला खारी पुरी म्हणतात. अशा या पुरीच चाट कॉम्बिनेशन अफलातून आहे.

याच चाट सेंटरमध्ये मिळणारा आणखी एक चाट प्रकार म्हणजे SPDP. हा प्रकार पुण्यात बऱ्याच ठिकाणी मिळतो. पुणेकर खव्य्यांची पसंती पाणीपुरी पेक्षा ही जरा अधिक SPDP लाच असते. SPDP म्हणजे शेवपुरी आणि पाणीपुरी याचं कॉम्बिनेशन.

पाणी पुरीच्या पुरिमध्ये शेवपुरीचं मटेरियल टाकून वरतून दही आणि पाणीपुरीचं पाणी टाकण्यात येते. पहिल्यांदा SPDP खाणारा प्रत्येक या पदार्थांचा कायमचा फॅन होतो. या दुकानात हायजिनकडे विशेष लक्ष दिल्यामुळे काही-बाही सशंयाचे कीडे उगाचच वळवत नाही.

मुंबईचा ‘लाडूसम्राट’

ladusamrat boardमुंबई | लोअरपरळ आणि लालबाग दरम्यान गणेश गल्लीजवळ मुंबई ‘लाडूसम्राट’ हे हॉटेल आहे. या हॉटेलातील वडा चटणी प्रसिद्ध आहे.

भारतमाता सिनेमाजवळ गेल्यावर तुम्हाला लाडूसम्राटचं सहज दर्शन होवू शकतं.

लालबागच्या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही कधी गेले, तर लाडूसम्राटला जरूर भेट द्या. लाडूसम्राटवर सतत वर्दळ असते, म्हणून जरा दमानंही घ्यावं लागेल.

Vada chatniलाडू सम्राटचा वडा खाण्याचं वेड ;लाडूसम्राट’ने मागील 25 वर्षांपासून खवय्यांना लावलं आहे. या वड्या बरोबर लाल आणि पांढरी चटणी मिळते. या चटणीमुळे या वड्याची टेस्ट काही औरच असते.

लाडूसम्राटमध्ये जैन वडाही मिळतो, हा वडा फक्त रविवारी मिळतो.

लाडूसम्राटमध्ये अनेक प्रकारच्या मिठाया आहेत. आंब्याचा सिझन असला की इथली आमरस पुरीची चव चाखण्यासाठी गर्दी होते. Aam Raasलाडू सम्राटची कोथिंबीर वडीही प्रसिद्ध आहे.

उपवासाचा दिवस असो किंवा नसो, लाडूसम्राटमध्ये साबुदाणा खिचडीही मिळते.

लाडू सम्राटची बासुंदीही अनेकांना आवडते. लाडू सम्राटचं पियुषही प्रसिद्ध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाडूसम्राटच्या मिसळ पावनेही खवय्यांची मनं जिंकली आहेत.

चालतं फिरतं हॉटेल

स्वप्नाली अभंग | मुंबई पुण्यासारख्या शहरात टपऱ्या, हातगाड्या, खाऊगल्ल्या, मॉल्सची फूडकोर्ट असे विविध आणि मुबलक पर्याय उबलब्ध आहेत. पण भटकंती आणि बरोबरच मेजवानी असा दुहेरी आंनद देणाऱ्या मुबंईतल्या ’द मुव्हींग कार्ट’ या चालत्या फिरत्या अनोख्या रेस्टोरन्टची नुकतीच भर पडली. यामुळे आता अनेक विकेन्ड आणि सेलिब्रेशन्स भन्नाट होतील, हे वेगळ सागांयची गरज नाही.

The moving cartमरीन ड्राईव्हवरचा क्विन नेकलेसचा नयरम्य नजारा आणि समोर वाढण्यात आलेली पंचतारांकीत व्यंजन ही या ’द मुव्हींग कार्ट’ ठळक वैशिष्ट्यं आहे. जर मोकळ्या हवेत आपल्या आवड्त्या व्यंजनांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही या रेस्टॉरन्टच्या वरच्या मजल्याचा ऑपशन्स निवडू शकता.

लोअर डेक हा वातानुकूलीत असून नेत्रसुखद प्रकाश योजना आणि सौम्य संगीत यामुळे समोर आलेल्या पदार्थांची लज्जत आणखीणच वाढते. मद्य विरहीत कॉकटेल, सुप स्टार्टर, डेझर्ट, मेन कोर्स हे ही सगळं मरीन प्लाझा या हॉटेल मधून आलेलं. इंडियन आणि कॉन्टिनेटल असे पर्याय यात उपलब्ध आहेत.

‘द मुव्हिंग कार्ट’ दिवसभरात दीड तासाच्या तीन सहली करते. या सहलींचा पिक अप पॉईट हॉटेल मरीन प्लाझामधून असणार आहे. नरिमन पॉईट्ला वळसा घालून चौपाटी आणि पुन्हा मग परतून हॉटेल मरिन प्लाझा अशी मुव्हिंग कार्टची सैर असणार आहे.

यात शाहकारी आणि मांसाहारी अमर्याद १२ कोर्स मेन्यूंचा समावेश आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा, स्वादिष्ट आणि भरपेट जेवण यामुळे मुव्हींग कार्ट मधला अनुभव संस्मरणीय ठरू शकतो.

या करीता तुम्हाला पूर्व नोदणी किंवा ऑनलाइन बुकिंग करणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.themovingcart.com या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

संपर्कासाठी +91 8689904000, +91 9702624000

शाहकारी प्रतिव्यक्तीसाठी रूपये१२००, मासांहारी प्रतिव्यक्तीसाठी रूपये १४००

(‘मायसिटीमायफूड’चा उद्देश नवनवीन तसेच परंपरागत हॉटेल्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. ऐन वेळेस येणाऱ्या अडचणी, अथवा सेवा-सुविधांचा दर्जा याबद्दल ‘मायसिटीमायफूड’ जबाबदार नाही)

ताकासाठी ‘क्षणभर विश्रांती’

butermilk-1
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये मिळणार ताक

स्वप्नाली अभंग : आरोग्याच्या दृष्टीने ताक अतिशय उत्तम, हे वेगळं सागांयची गरज नाही. ताकाला तर पृथ्वीवरचं अमृत म्हटलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, ताकात अशी काय व्हरायटी आहे, एवढं ताक पुराण कशासाठी, तर याचं उत्तर तुम्हाला हे ताक पुराण वाचाल्यानंतर मिळेल.

लाकडाच्या रवीने घुसळलेलं आबंट मधूर ताक उन्हाळ्याच्या दिवसात क्षीण घालवण्यासाठी मदत करतं. हल्ली डायट कॉन्शस लोक वाढल्यामुळे बटर मिल्क म्हणजेच ताक हॉटेलांमध्येही सहज मिळतं. पण हे ताक असतं मिक्सर किंवा इलेक्ट्रिक रवीने तयात केलेलं.

कधी कधी खूपच आबंट, तर कधी कधी मसालाच्या ताकच्या नवाखाली झणझणीत मिरच्या टाकलेलं. पण मुबंई-गोवा महामार्गावरचं कर्नाळा अभायारण्याजवळचं ‘क्षणभर विश्रांती’ मधलं ताक खरोखर इथं घेतलेली विश्रांती सार्थ ठरवते आणि प्रवासाचा क्षीण ही कमी करते.

लाकडी रवीने घुसळलेल्या या ताकातल्या मीठ आणि जिरेपूडच्या चवीने ताक पिण्याचा आनंद द्वीगुणीत होतो. ऑर्डर प्रमाणे ताक तुमच्या समोरच घुसळं जातं. ताजं ताजं आणि मधुर या वैशिष्ट्यामुळे हे ताक प्रसिध्द आहे.

या हॉटेलात बारा महिने ताक, मटका दही, खरवस, लस्सी या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी असते. याशिवाय थंडाई फूल, मसाला ताक हे पर्याय ही आहेत. इथलं हॉट मिल्क ही अप्रतिम. दुधाला नाकं मुरडणाऱ्या मंडळीने इथं एकदा नक्की यावं.
1984 पासूनची परंपरा
क्षणभर विश्रांती या मिल्क प्रोडक्ट हॉटेलची सुरवात सुहास सामांत यांनी १९८४ साली केली. तेव्हा हे मुबंई गोवा महामार्गावरील ऐकमेव हॉटेल होतं. स्वच्छता आणि उत्कृष्ट प्रतीचे दुधाचे पदार्थ त्यात निरनिरळी व्हरायटी यामूळे मुबंई गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती ही होतेच.

या हॉटेलच्या स्वत:च्या ५० म्हशी आणि १० गाई आहे. त्यामुळे दर्जाबाबात नो क्वेश्चन अ‍ॅट ऑल. माझ्या मामाच्या गावीही दुध दुभतं भरपूर असायचं. ताक मातीच्या रांजणात घुसळलं जायचं आणि आम्हा बालचमूला गरम गरम भाकरी आणि ताक दिलं जायचं. आज जरी ताक भाकरी हा पदार्थ ऑड वाटत असला तरी अजुनही ताक भाकरीची चव जिभेवर रेगाळतेय.

चवीने खाणार, त्याला कोल्हापुरी मानवणार..!

padma shinde(पद्मा शिंदे, कोल्हापूर ) कोल्हापूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते, ती इथली संस्कृती आणि कला – क्रीडा परंपरा…

आखाड्यातला कुस्ती असो किंवा कलाकारांची कला, दोन्ही इथेच अनुभवावं. कोल्हापूर म्हणजे रांगडेपण, मात्र रांगड्या भाषेतही दडलंय अपार प्रेम.

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरी साज, चप्पल अशा वस्तू जगभरात ओळखल्या जातात. पण त्याचसोबत खास आहे ती कोल्हापूरची खाद्यसंस्कृती.

कोल्हापूर म्हटल्यानंतर सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते तांबडा पांढरा रस्सा. खास कोल्हापूरी स्टाइलचं मटण. तांबडा रस्सा म्हणजे फक्त झणझणीत तिखट असा अनेकांचा समज आहे.

थोडं जास्त तिखट आणि वर मिरची टाकली की झाली कोल्हापुरी डिश तयार असा शेट्टी – पंजाबी हॉटेलांनी गैरसमज करुन ठेवलाय. पण कोल्हापुरी जेवण म्हणजे तिखटपणा नाही तर ती एक चव आहे.

दगडी पाट्यावर वाटलेले मसाले वापरुन बनवलेलं झक्कास कोल्हापुरी मटण म्हणजे खवय्यांसाठी एक लज्जतदार ट्रीट. कोल्हापुरात अनेक ठिकाणी अशा लज्जतदार मटणाची चव तुम्ही चाखू शकता.

पद्मा गेस्ट हाऊस, पद्मा हॉटेलमध्ये तुम्ही तिखट नव्हे, तर चमचमीत मटणाचा आस्वाद घेऊ शकता. बाहेर हॉटेलमध्ये मटण खायचं म्हणजे टेन्शनच येतं. पण इथे फ्रेश डिश मिळणार याची खात्री आहे.

खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उत्तम चवीच्या कोल्हापुरी मटणावर ताव मारायचा असेल तर पद्मा हॉटेलला नक्की भेट द्या.

कोल्हापुरात केवळ नॉनव्हेज खाणाऱ्यांचीच चंगळ आहे असं नाही तर शाकाहाऱ्यांसाठीही खूप सारे अॉप्शन इथे आहेत. मिसळीची खरी चव अनुभवायची असेल तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही. इथल्या मिसळीची अनेकांनी कॉपी करायचा प्रयत्न केला, पण इथल्या मिसळीची त्याला सर नाही.

मुंबईमध्ये शेट्टीच्या हॉटेलांमध्ये पांढऱ्या वाटण्यावर फरसाण पापडी टाकून मिसळ म्हणून सर्व्ह केलेल्या डिशला मिसळ म्हणायला जीभ वळत नाही. तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत मिसळ खाण्यासाठी खासबाग हॉटेल, फडतरे आणि चोरगे मिसळ असे काही पर्याय तुमच्यासमोर आहेत.

या तीन ठिकाणच्या मिसळीच्या चवीत थोडाफार फरक आहे पण त्या चविष्ट आहेत हे नक्की. खासबाग मैदान परिसरात गेल्या 70 वर्षांहून अधिक काळपासून खासबाग हॉटेल आहे.

आधी टपरीवजा असणाऱ्या जागेच हॉटेलमध्ये रुपांतर झालं. गेल्या वर्षभरापूर्वी याच जागी नव्याने हॉटेलचा कायापालट करण्यात आलाय. पण चव मात्र तशीच…अगदी काटा किर्रर…

महालक्ष्मी मंदिर परिसरात फिरायला जायचं तर राजाभाऊंची भेळ ठरलेली. संध्याकाळी राजाभाऊंच्या भेळच्या स्टॉलवर असणारी गर्दीच या भेळीच्या चवीची महिती सांगते.

राजाभाऊंच्या पुढच्या पिढ्यांनीही हाच व्यवसाय पुढे सुरु ठेवलाय. मिरची आणि कैरीच्या जोडीने या भेळीची चव आणखी वाढते. रंकाळ्यावर अनेक भेळीच्या गाड्यांवर राजाभाऊ भेळच लिहिलेलं दिसेल.

मात्र याबद्दल विचाराल तर भेळवाला काहीही न बोलता फक्त हसेल हे नक्की. महालक्ष्मी मंदिर परिसरातली खाऊ गर्ल्ली आता केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात थाटण्यात आलीये. इथे या चमचमीत भेळीची चव तुम्ही चाखू शकता.

एक ना दोन अशा अनेक पदार्थांची यादी इथे देता येईल. पण आज इथेच थांबते कारण लिहितानाही ती चव आठवून तोंडाला पाणी सुटतंय.

कोल्हापुरी जेवणाची चव तुमच्या जिभेवर खूप काळ रेंगाळत राहाते. तुम्ही खवय्ये असाल तर कोल्हापूरला नक्की भेट द्या.

‘तुमच्यासाठी काय पण’ ही कोल्हापुरी आदरातिथ्याची रित. त्यामुळे इथली अनेक हॉटेल्स तुमच्या सेवेसाठी नेहमी तयार आहेत. शेवटी जो चवीने खाणार त्याला कोल्हापुरी मानवणार.

(पद्मा शिंदे, ‘एबीपी माझा’च्या  पत्रकार आणि अँकर आहेत)

मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली.

Marathi Misal puneमिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट.

अप्रतिम चवीबरोबरच ही मिसळ विक्रमासांठी ही नावाजलेली. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर असणाऱ्या आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

थोडीशी गोड आणि तिखट असणाऱ्या या मिसळीच्या एका प्लेटमध्ये हमखास पोट भरतं. पुण्यातल्या मिसळीमध्ये या मिसळी ने आपलं वेगळेपण जपलं आणि सिद्ध ही केलं.

मटकी, बटाटा, कांदा पोहे, चिवडा, शेव, ओलं खोबरं आणि कोथींबीर आणि तर्रीचा रस्सा ये सारं पाहून तोंडाला पाणी सूटतं. इथं खव्य्यांना वेगळी चव मिळते पण त्याबरोबरच हा पहिल्यांदा येणारा खवय्या हा नंतर या मिसळीचा नियमित ग्राहक बनतो.
मराठी मिसळ
या मिसळीच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ही मिसळ छोट्या परातीत मिळते, त्यामुळे मिसळ मिक्स करायला ऎसपैस जागाही मिळते. राजकीय नेते, कलाकार, इतिहास संशोधक, तरूण, तरूणी यांचा तर हा फेवरेट मिसळ कट्टा.

रोज ३५० ते ४०० ग्राहक या मिसळीचा आस्वाद घेतात. रविवारी हाच आकडा ५०० ते ६०० च्या घरात पोहचतो. या मिसळी चे मालक आशोक जाधव म्हणतात. आमच्या मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे ती थंड पडल्यावर ही तितकीच चवदार लागते.

जाधव याचं संपूर्ण कुटुंब मिसळ प्रेमींना अप्रतिम चवीची मिसळ देण्यासाठी तत्पर असतं. जाधव यांच्या पत्नी स्वत: मिसळीसाठी मसाले बनवतात. अशोक जाधव यांनी मिसळ बनवण्याचं तंत्र स्वत: विकसित केलं आहे, आणि रोज ते स्वत: ही मिसळ बनवतात, त्यामुळे या मिसळीच्या चवीत कधीच बदल होत नाही.

ही मिसळ खाल्ल्यानंतर नाक आणि डोळ्यातून पाणी ही येणारा नाही, आणि जळजळ होणार नाही. यामुळे पुढ्यातल्या मिसळीच्या प्रत्येक घासाचा आस्वाद ग्राहकांना घेता येतो. यामुळे आबालवृध्द ही मिसळीवर तुटून पडतात.

विक्रमी मराठी मिसळ
चवी बरोबरच अनोखे विक्रम आणि ’मराठी स्कीम’ साठी ही मिसळ प्रसिध्द आहे. २०११ ला भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामान्याच्या वेळी भारताच्या विजया निमित्त मराठी मिसळ एकावर एक फ्री मिसळ देण्यात आली होती. त्यावेळी १५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच मिसळ फ्री ही देण्यात आली. त्या दिवशी हॉटेलच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफिक ही जाम झालं होतं. ही बातमी अगदी साता समुद्रा पार ही पोहचली. सचिन तेंडुलकरच्या महाशतकालाही जाधव यांनी एकावर एक फ्री मिसळ देण्याचा निर्णय घेतला.

याला खवैय्यांनी उदंड प्रतिसाद दिला, ३५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच फ्रि देण्यात आली होती. अशोक जाधवांचा हा उपक्रम एक विक्रमच म्हणावा लागेल. या हॉटेलमध्ये जैन मिसळ ही आहे. या हॉटेल ची आणखी ऎक इंटरेस्टिंग स्कीम म्हणजे इथं येणाऱ्या स्त्रीयांना गजरा ही देण्याची अनोखी मराठी स्कीम इथं आहे.

पत्ता
पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

पौष्टीक इडलीचं उदय विहार

vegस्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’

uday vihar pune“बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर ऑर्डर दिलेला पदार्थ येतो.

टिळक रोडवरच्या एस.पी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या उदय विहार या छोटेखानी ‘स्नॅक सेंटर’मध्ये जादुई वाटावं, असं हे नेहमी दिसणारं चित्र. इडली बरोबरच खिचडी, मिसळ, पोहे, उपमा, एस.पी.डी.पी या पदार्थांवर सगळेच तूटुन पडतात.

पौष्टिक नाश्ता
पौष्टिक इडल्या इथली खासियत. टपोऱ्या इडल्या मध्येच मटार, गाजर, फ्लॉवर आणि थोडासा मसाला असं मस्तं पौष्टिक कॉम्बीनेशन इथं चाखायला मिळतं. या इडल्या बरोबर ओला नारळ आणि डाळं असलेली चटणी मिळते.

थोड्याशा पिवळसर असणाऱ्या या इडल्यांमध्ये वाफवतानाच या भाज्या घातल्या जातात. या इडल्यांची चव ही अगदी अप्रतिम आहे. इडली बरोबरच ‘उदय’च्या पोहे, उपमा, बटाटे वडा, खिचडी आणि मिसळ हे पदार्थ एकदम फर्स्ट क्लास असतात.

कांदा पोहे त्यावर ओला नारळ आणि शेव या पोह्यांच्या एका प्लेटमध्ये कदाचित पोट भरतं. इथलं उपीट तर अप्रतिम. बारीक रव्याचं थोडसं पातळसर आणि त्यावर शेव, हे डिश खाल्यानंतर झकास हा शब्द आपसूकच ओठांवर येणार. इथल्या खाद्यपदार्थांवर ताव मारल्यानंतर कोकम सरबत, पन्हं, ताक ही मराठमोळी पेयं ही उपलब्ध आहेत.

साठ वर्षांचे साक्षीदार
उदय विहार १९५४ साली सुरू झालं, आणि आजही आपली खासियत टिकवून आहे. केवळ १०० स्क्वेअर फूटांच्या जागेत असलेल्या या हॉटेलच्या पदार्थांची जादू काही औरच आहे.

या स्नॅक सेंटरचे मालक उदय लवाटे वयाच्या साठीतही आलेल्या गिऱ्हाकांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करतात. या स्नॅक सेंटरच्या समोरच एस.पी कॉलेज आहे. त्यामुळे एस.पीच्या विद्यार्थी आणि स्टाफचा हा फेवरेट खाद्य कट्टा.

विद्यार्थी कॉलेजचे माजी विद्यार्थी झाले, तरी आपल्या या कट्ट्याला मात्र विसरत नाहीत. इडली, पोहे, आणि उपमा यांची चव घेण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून ते उदय काकांकडे येतात.

हे सारे अप्रतिम चवीचे पदार्थं बनवण्याचं श्रेय जातं, ते उदय काकांच्या पत्नी रिमा लवाटे यांना. यामुळे चवीत आजतागायत बदल झालेला नाही.

पुण्यात आल्यानंतर खास ‘उदय विहार’मध्ये नाष्टा करायला येणारे अनेक जण आहेत. अगदी सकाळी ८.३० सुरू होणारं हे स्नॅक सेंटर रात्री ९ पर्यंत चालू राहतं. शिवाय इथल्या पदार्थांचे रेट हे ३० रुपयांच्या आत आहे.

मालवण समुद्र

non-veg - Copyअजित वायकर

डिलाईल रोडची ओळख आहे ती मिनी कोल्हापूर म्हणून. सुमारे ५० हजार कोल्हापूरकर इथं संसार थाटून असावेत.  पण, इथल्या हॉटेलांतली खाद्यसंस्कृती मात्र अस्सल कोकणी आहे. या हॉटेलांच्या मेनूतून कोल्हापुरी सामिष हद्दपार असलं तरी हा अनुशेष कोकणाने भरून काढला आहे.

ताटात येणारं हे अरबी समुद्रातलं ‘लजीज’ चवींचं जैववैभव दर्दी खवय्यांची दाद घेऊन गेलं नाही, असं होणार नाही. पापलेट-सुरमईपासून मांदेली-कर्लीपर्यंत नाव घ्याल त्या माशांचा सुकाळ आहे. तिस-याची कोशिंबीर आहे नि मसाल्यात घोटून केलेलं सुकटाचं लोणचंदेखील आहे.

हॉटेलांची नावंसुद्धा कोकणातल्या गावांचा अभिमान मिरवणारी. त्यात गर्दी खेचणारं आघाडीवरचं नाव म्हणजे मालवण समुद्र!! या परिसरात सी-फूडवाली हॉटेलं खंडीभर आहेत. पण, मालवण समुद्रची सर त्यातल्या फारच कमी हॉटेलांना आहे.fish dish

इथले दरदेखील खिशाला रडवणारे नाहीत. प्रत्येक पदार्थाची किंमत एकदम माफक. मालवणी तिखटात घोळून सजवलेलं ताजं फडफडीत पापलेट शंभराच्या नोटेला तुमच्या समोर हजर होतं.
अगदी स्वस्तात पोट भरून तिस-याची (शिंपल्याची)  कोशिंबीर किंवा भाजी खाण्याची चैनदेखील याच ठिकाणी परवडू शकते.

कारण, इतर हॉटेलांत शंभराच्या किमान तीन नोटा काढल्याशिवाय तिस-याचा ‘ति’सुद्धा नजरेला पडत नाही. जर कुणाला ‘मालवण समुद्र’ऐवजी दुसरीकडे कमी किंमतीत तिस-या चाखायला मिळालाच, तर आपल्या भाग्याचे कोडकौतुक करण्याऐवजी नंतर तो नशिबाला शिव्या घालत ताटावरून उठण्याची शक्यताच जास्त.

कारण, अशा तिस-यांच्या कवचाआड खाण्याचा ऐवज सापडण्याची शक्यता जवळपास ‘नाही’च्या घरात असते. शिवाय, तिस-याला चिकटलेली समुद्राची बारीक रेती जाऊन तोंडात जाऊन आनंदाचा विचका भिती आहेच.

तसंही तिस-या खाताना दातांना जरा जास्तच कष्ट पडतात. मग उगीच कमी किंमतीच्या तिस-याच्या मोहात कशाला पडायचं ? आपल्याला पोटाला खूष करायचं असतं, जीभ तृप्त करायची असते.

दातांना व्यायाम घडवायचा नसतो आणि हिरड्यांना दुखापतही करून घ्यायची नसते. त्यामुळे बजेट कमी आणि तिस-या खाण्याची इच्छा असेल, तर डिलाईल रोड- लोअर परळ परिसरात ‘मालवण समुद्र’शिवाय दुसरा चांगला पत्ता नाही.

रावस-पापलेटसारख्या राजेशाही माशांच्या तुलनेत मांदेली-सुकटाचा रुबाब कमी असतो. त्यामुळे ब-याच हॉटेलांच्या मेनूतून ही जोडगोळी गायब असते.

पण, ज्याच्या जिभेला या हॉटेलातल्या मांदेली फ्रायचा स्पर्श झालाय, तो आयुष्यात मांदेलीला कमी लेखण्याचा मूर्खपणा परत कधी करणार नाही. मासे चवदार तर असतातच. पण, चटकदारसुद्धा असतात हे कळतं ती ‘मालवण समुद्र’मध्ये बनणारी मांदेली खाल्ल्यानंतर !
या हॉटेलातल्या मसाल्यात ओल्या नारळाचा भरपूर वापर होतो.

वाटीचे काठ पकडून ठेवील, इतका घट्ट ग्रेव्हीवाला रस्सा इथं ओरपायला मिळतो. बाकीच्या हॉटेलांप्रमाणे रस्सा म्हणून तिखटजाळ पाणी वाढण्याचा प्रकार इथं होत नाही.
तुम्ही मासे घ्या किंवा चिकन-मटन.. इथल्या तांबूस-सोनेरी चमक असलेल्या वड्यांना आणि नीर डोश्यासारख्या लुसलुशीत तांदळाच्या भाकरीला न्याय द्यावाच लागतो.

हा परिसर जुनाट बीडीडी चाळींचा. कनिष्ठ मध्यमवर्गीय कामकरी मंडळींचा. मुंबईत पैशाचा महापूर वाहतो, डिलाईल रोडवर येऊन तो ओसरतो. आर्थिक सुबत्तेचा अथवा अभावाचा परिणाम त्या-त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीवरसुद्धा दिसून येतो.

भले डिलाईल रोडवरच्या या ‘मालवण समुद्र’मध्ये लोअर परळच्या उंची हॉटेलांचा झगमगाट नसेल, पण चवीच्या बाबतीत हे हॉटेल त्यांच्या इतकंच सरस आहे.

त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर कुठलाही असो. एखादा वधूपिता आपल्या मुलीच्या आयुष्याचे कल्याण व्हावे, यासाठी जसा जिवाचा आटापिटा करून सुयोग्य वर धुंडाळतोच, तसे दर्दी मासेखाऊ शहराच्या कानाकोप-यात कुठेही असले, तरी जेवणासाठी ‘मालवण समुद्र’च्या किना-यावर गर्दी करतातच.

वडापावचा गाव

जान्हवी मुळेveg

कर्जतचं नाव काढलं की बहुतेकांना तीन गोष्टी लगेचच आठवतात- फास्ट लोकल, पावसाळी सहल आणि वडापाव. कर्जतचा वडापाव आहेच तसा खास.

janhavee mooleमुंबई आणि पुण्याच्या कुशीत वसलेल्या या गावाची ओळखच बनला आहे वडापाव. या दोन शहरांना जोडणारी रेल्वे झाल्यावरच कर्जत वाढलं, फोफावत गेलं. पुण्याच्या वाटेवर घाटमाथा चढण्याआधी गाड्या कर्जतला थांबू लागल्या. नवं इंजिन जोडलं जाईपर्यंत स्टेशनवर वडेवाल्यांचा जमके धंदा होऊ लागला.

स्टेशनवरचा हा वडा, म्हणजे दिवाडकरांचा वडा. आकारानं काहीसा लहान आणि म्हणूनच घाटातून गाडी जाताना सहज खाता येईल असा. लहानपणी कधी रेल्वेनं प्रवास करायची वेळ आली, तर आम्ही स्टेशनवरचा वडा खायचो आणि कधीकधी केवळ दिवाडकर वडा घेण्यासाठी स्टेशनवर जायचो.

कर्जतपाठोपाठ नेरळ, माथेरान आणि मुंबई-पुणे हायवेवरही दिवाडकर वडा मिळू लागला. आता दिवाडकरांनी फ्रँचायझी इतरांना दिली आहे. पण गेली कित्येक दशकं, कित्येक पिढ्या दिवाडकर स्पेशल वडा आपलं नाव राखून आहे. अगदी पु.लं., आचार्य अत्रेंनीही इथल्या बटाट्यावड्याचा उल्लेख केला आहे ओझरता.karjat vada pav

कर्जतच्या वाटेनं प्रवास करणाऱ्यांना दिवाडकर वडा ओळखीचा आहे. पण गावात आणखीही काही ठिकाणी उत्तम वडा मिळतो. त्यातले दोन वडेवाले माझ्या खास आवडीचे आहेत.

एक आहे स्टेशनबाहेरचा आनंद भुवनचा वडा आणि दुसरा सट्टूचा वडा. आनंद भुवन म्हणजे दगडे कुटूंबियांचं उपहारगृह. चारुदत्त दगडे १९८८ पासून या व्यवसायात आहेत. मला आठवतं तेव्हापासून आम्ही बहुतेकदा त्यांच्याकडूनच वडा विकत घ्यायचो. आजही घेतो.

तसं आमच्या घरी बाहेरचं अरबट-चरबट खायला साफ मनाई असायची. अपवाद केवळ दगडेकाकांकडच्या वड्याचा. आता त्यांच्या नव्या पिढीनं वेगळी वाट निवडली आहे, पण दगडे काका आजही स्वतः धंद्यात जातीनं लक्ष घालतात. त्यांच्याकडच्या वड्याचा दर्जा आजही तसाच आहे.

पुढे आणखी एका वड्याची चव आमच्या जिभेवर रेंगाळू लागली. आमच्या घरापासून जवळच असणारा सट्टूचा वडा. सट्टू म्हणजे संतोषदादा. आधी हातगाडी, मग छोटा स्टॉल आणि मग स्वतःचा गाळा असा सट्टूच्या वड्याचा प्रवास, वड्यातल्या कमाईनंच झालेला. मराठी शाळेला लागून एका इमारतीच्या आतल्या बाजूस हे दुकान आहे.

काळ बदलला, तसा एक बदल मात्र घडला आहे. किंमत. पूर्वी एक रुपयाला मिळणारा वडापाव आता दहा रुपयांना मिळू लागला आहे. महागाईमुळे तीन महिन्यांपूर्वीच अचानक तीन रुपयांनी किंमत वाढवण्यात आली. पण चव मात्र अजूनही तशीच आहे.Vada Pav

कर्जतचा वडापाव म्हटलं तर इतर वड्यांसारखाच असतो. पण याची खासियत आहे ती यासाठी वापरला जाणारा बटाटा आणि वड्याबरोबर मिळणारी लसणाची खमंग चटणी. म्हणूनच एकदा हा वडा खाल्लात, की कधीच विसरणार नाही असा. कर्जतकरांच्या घरी बाहेरगावहून कोणी पाहुणे आले, की आजही वडापावची न्याहरी एकदातरी होतेच.

कामानिमित्त आता मी मुंबईत स्थिरावले. इथे तर वडापाव म्हणजे आद्य-खाद्यच. त्यामुळे आमच्यासारख्या वडापावप्रेमींची चंगळच. गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या वडापावसाठी प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देऊन झाल्या. शिवाजी पार्क, किर्ती कॉलेज, पार्ल्याचं साठ्ये कॉलेज इथल्या वड्यापासून ते जम्बो किंगचा वडा खाऊन झाला. पण कर्जतच्या वड्याची सर कशालाच नाही. कदाचित तिथली मोकळी हवा, पाऊस आणि माझं गावाशी असलेलं नातं, यामुळेच कर्जतचा वडा मला जास्त जवळचा वाटतो.

प्रत्येक वड्याचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे, हे मात्र खरं. म्हणूनच मुंबईतून बाहेरगावी गेलेला माणूस वडापावसाठी कासावीस होतो. माझ्या दिल्लीतील मित्र-मैत्रिणींनी तर मला येताना वडापाव आण असा आदेशच दिला होता.

मला जमलं नाही, आणि रश्मी अगदी खट्टू झाली. पण मग राजीव चौक (कनॉट प्लेस) मेट्रो स्टेशनवर अगदी मुंबईसारखाच वडापाव विकणाऱ्या स्टॉलचा शोध लागला तेव्हा रश्मीला कोण आनंद झाला होता! त्या आनंदातच मला माफीही मिळाली. आणि एक वास्तव जाणवलं, समोसा जगभर पोहोचला, तसा वडा देशभर तरी पोहोचायला हवा. वडापावच्या गावातून आलेल्या वडापावप्रेमीनंच हे पाऊल टाकावं असं मनापासून वाटतं…